कर्ज फेडण्यासाठी वाहन चोरी

पिंपरी – कर्ज फेडण्यासाठी वाहन चोरी करणाऱ्या एका चोराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई मोरवाडी चौकात करण्यात आली.

संतोष राजाराम शिंदे (वय-37, रा. नाना कोकरे यांची चाळ, खोली नंबर चार, अंगणवाडी रोड, मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निलेश बोडखे यांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मोरवाडी न्यायालयासमोर सापळा रचून शिंदे याला थांबवण्याचा इशारा केला. मात्र तो मोरवाडीच्या दिशेने वेगात जाऊ लागला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग करून लालटोपीनगर झोपडपट्टी समोर पकडले. त्याच्याकडे असलेल्या मोटार सायकल बाबत विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या कार्यालयात आणून कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. पिंपरी आणि चाकण पोलीस ठाण्यातील चोरीचे दोन गुन्हे उघड झाले असून निगडी येथील वाहनाबाबत तपास सुरु आहे. त्याला पुढील कारवाईसाठी पिंपरी पोलिसांकडे देण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, पोलीस अप्पर आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, निलेश बोडखे तसेच पोलीस कर्मचारी राहुल खारगे, किरण अरुटे, दत्ता बनसुडे, चेतन मुंढे, संदीप ठाकरे, अतुल लोखंडे, भास्कर भारती, नितेश बिच्चेवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)