कर्ज फेडण्यासाठी रचला अपहरणाचा बनाव

– मेहुण्याकडून पैसे उकळण्याचा डाव उधळला

पिंपरी – स्वतः वरील कर्ज फेडण्यासाठी मेहुण्याकडूनच पैसे उकळण्याचा डाव पोलिसांनी उधळला आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

विठ्ठल वाबळे असे अपहरणाचा बनाव रचलेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी सीमा वाबळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि. 20) सकाळी विठ्ठल वाबळे हे आपल्या गवळीनगर, भोसरी येथील प्लेसमेंटच्या टाटा ऑटो कन्सलटंन्सी या कार्यालयामध्ये गेले होते. मात्र दरम्यान पत्नीला खंडणीचा फोन आल्याने पतीचे अपहरण झाल्याची फिर्याद सीमा यांनी दिली. यावेळी खंडणीपोटी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.

अपहरण झाल्याची माहिती मिळताच भोसरी पोलीस, गुन्हे शाखा, खंडणी विरोधी पथक यांनी समांतर तपासला सुरूवात केली. अपहरण झालेली व्यक्ती स्वारगेट परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सकाळी स्वारगेट येथील एका लॉजमधून विठ्ठल वाबळे याची सुटका करण्यात आली. त्यानंतर केलेल्या चौकशीमध्ये वाबळे यांनी आपल्या मित्राच्या मदतीने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचल्याचे उघड झाले.
वाबळे हा विविध कंपन्यामध्ये प्लेसमेंटची कामे करतो. यासाठी त्याने अनेक तरुणांकडून पैसे उकळले आहेत.

वाबळे याचा मित्र मुलाणी (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्यामार्फतही सात जणांकडून 5 लाख रुपये वाबळे यांनी घेतले होते. ते त्याला तातडीने परत करायचे होते. यासाठी पत्नी व मेहुण्याला फोन करुन त्याने पाच लाखांची खंडणी मागितली. पत्नीला याची पुसटशीही कल्पना नव्हती. खंडणीचा फोन येताच तिने थेट भोसरी पोलीस ठाणे गाठले त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात सर्व पितळ उघडे पडले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)