कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर कारवाई करण्याची अखिल भारतीय छावा संघटनेची मागणी

पिंपरी- सरकारने जाहीर केलेले असतानाही तरुणांना व्यवसायासाठी कर्ज न देणाऱ्या बॅंकांवरती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय छावा, मराठा युवा संघटनने केली आहे. राज्यमंत्री व अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील शहरात आलेले असताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन सद्यस्थिती त्यांच्यासमोर मांडली व आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. या निवेदनात म्हटले आहे की, मराठा तरुणांना दहा लाख रुपयांचे कर्ज दिले जाणार असल्याचे नुकतेच सरकारने जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या युवकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी बिगरव्याजी कर्जपुरवठा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. परंतु राष्ट्रीयकृत बॅंका होतकरु मराठा तरुणांना कर्ज देण्यासाठी नकारघंटा वाजवत आहेत. एवढेच नव्हे तर कर्जाच्या तिपटीने तारण मागत आहेत. वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी करून कर्ज देणे टाळले जात आहेत. शेतकऱ्यांची मुले व मुली महामंडळाकडे आशेने पाहत आहेत. बॅंका कर्ज देत नसल्याने मराठा तरुणांना व्यवसाय सुरू करत येत नाही. कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवरती कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच बेरोजगार तरुणांचे अर्ज महामंडळाच्या कार्यालयात भरुन घ्यावेत, जेणे करून बाहेर अर्ज भरण्याचे पैसे वाचतील. यावेळी संघटनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष गणेश जाधव, संघटक बिट्टु पांचाळ, प्रमोद लेंडवे, राहुल चालुक्‍य, बलभीम जगदाळे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)