कर्ज देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक

पिंपरी – कर्ज देण्याचे आमिष दाखवून महिलेकडून वेळोवेळी पैसे घेऊन तिची एक लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 23 एप्रिल 12 जून 2018 दरम्यान घडला.

शुभांगी पाटील (वय 24, रा. आदर्श नगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांना लघुउद्योग सुरु करायचा आहे. त्यासाठी त्यांना पैशांची गरज आहे. कर्ज घेऊन लघुउद्योग सुरु करणार असल्याची माहिती चार आरोपींनी मिळवली. त्याबाबत संगनमत करून नवी दिल्ली येथील मनी सोल्युशन कंपनी कर्ज देणार असल्याचे त्यांना आमिष दाखविले.

कर्ज मंजूर करण्यासाठी प्रोसेस असून वेगवेगळ्या कारणांसाठी पाटील यांना वेळोवेळी 97 हजार 160 रुपये एका महिलेच्या खात्यावर भरण्यास सांगितले. पाटील यांनी ही रक्कम वेळोवेळी आर टी जी एस आणि आय एम पी सी द्वारे संबंधित महिलेच्या खात्यावर जमा केली. मात्र सदर व्यक्तींकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी पोलीस ठाणे गाठले. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळ तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)