कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठीचे मार्ग (भाग-२)

कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठीचे मार्ग (भाग-१)

कर्जांची फेररचना

दुसरी गोष्ट म्हणजे कर्जाची फेररचना किंवा सगळ्या कर्जाचे एकत्रीकरण करून एकच हप्ता होऊ शकतो याची चाचपणी करणे. कर्जाची फेररचना करण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञ संस्थांचीही मदत होऊ शकते. कर्ज घेणाऱ्याच्या फेडीच्या क्षमतेनुसार हप्ते बांधून दिले जाऊ शकतात. कर्जाच्या फेररचनेनंतर कर्जाचा हप्ता किमान सुसह्य असा होऊ शकतो. पेनल्टी रद्द किंवा कमी होऊ शकते. क्रेडीट कार्डवरील कर्जाचे रुपांतर पर्सनल लोनमध्ये केले जाऊ शकते. कर्ज देणाऱ्या संस्थांच्या नियमानुसार हे सगळे प्रत्यक्षात येऊ शकते.

संपत्तीची विक्री

घरावर किंवा सोने गहाण ठेवून रक्कम उभी करणे, भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढणे यासारखे उपाय करता येऊ शकतात. कारण अशा कर्जावरील व्याजदर तुलनेत कमी असतो. परतफेडीची क्षमता असेल तर जास्त व्याजदराच्या कर्जाची फेररचना करण्यासाठी कमी व्याजदराचे कर्ज घेणे शहाणपणाचे ठरते. जेव्हा कर्जफेडीच्या क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते.  कर्जफेडीसाठी आपल्याकडील संपत्तीची विक्री हा देखील मार्ग ठरू शकते. कारण असलेल्या संपत्तीपेक्षा थकीत कर्जाचा बोजा जास्त असेल तर आपल्याकडे वजा संपत्ती आहे असा त्याचा अर्थ होतो. अशा प्रकारे संपत्तीची विक्री करावी लागते तेव्हा अऩेक कर्जदार चेहरा लपवत, समाजापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात. अशा स्थितीत कुटुंबातील सगळ्यांनी एकमेकांना आधार देत आत्ता मोठी किंमत मोजावी लागली असली तर दीर्घकाळात हा निर्णय लाभदायक ठरणार असतो, ही बाब लक्षात घेतली पाहिजे.

खर्च आणि उधारीवर नियंत्रण

चौथी गोष्टी म्हणजे खर्च आणि उधारीवर नियंत्रण. परिस्थिती स्थिरस्थावर होत नाही तोपर्यंत क्रेडिट कार्डसारख्या गोष्टींचा वापर पूर्णपणे थांबवणे. आतापर्यंत सढळ हस्ते खर्च करण्याची सवय असणाऱ्या कुटुंबांना मर्यादित खर्च करण्याचा पर्याय कठीण वाटतो. परंतु अशा कठोर निर्णयांमुळेच परिस्थिती लवकर पूर्वपदावर येते. कर्जफेडीसाठी कमाईनुसार जीवनशैली स्वीकरावी लागते. त्यासाठी लग्नकार्यातील अवाढव्य खर्च, सणाला होणारा खर्च, हौसमौजेपोटी होणारा खर्च या सगळ्यांवर नियंत्रण आणावे लागते. असे करणे अनेकांना मानसिकदृष्ट्या अवघड जाते. आपल्याकडील प्रथा-परंपरांमध्ये अडकलेल्यांना त्यातून बाहेर पडणे कठीण बनते. त्यातून अऩेकदा तणाव, मनस्थिती ढासळणे, आत्महत्येचे विचार अशा गोष्टी घडू शकतात. अशा स्थितीत परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी उपचार व मदत घेणे आवश्यक असते.

कर्ज फेडावेच लागते…

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्ज फक्त फेडण्यामुळेच संपते ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणखी कर्ज घेण्यामुळे परिस्थिती आणखी वाईट होत जाते. घेतलेला कर्ज फेडलेच पाहिजे. फक्त त्यासाठी सहन होईल इतपत आर्थिक ताण आणि त्यासाठी कर्जाची फेररचना या बाबींचा विचार केला पाहिजे. मात्र या सगळ्या गोष्टीत वेळेवर कराव्या लागतात.

– चतुर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)