कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठीचे मार्ग (भाग-१)

अऩेकदा तरुण वयात गरजा भागवण्यासाठी किंवा चैनीच्या वस्तू घेण्यासाठी कर्ज घेतले जाते. त्याचे सरसकट उदाहरण म्हणजे मोबाईल फोन. अनेकदा पन्नास-साठ हजारांचा मोबाईल कर्ज काढून खरेदी केला जातो. मोठा टीव्ही, वॉशिंग मशिन, फ्रिज अशा गोष्टींची खरेदी कर्ज काढून केली जाते. दुचाकी, चारचाकी वाहनाची खरेदी तर घरासाठी कर्ज घेणे योग्य असते पण नंतर अंतर्गत सजावट, रिनोव्हेशन अशा गोष्टींदेखील कर्ज काढून केल्या जातात. यात क्रेडीट कार्डचे बिल/थकबाकी असू शकते. मग एकामागून एक असे विविध हप्ते सुरु होतात आणि आपल्यावर एकूण किती मोठे कर्ज आहे हे लक्षात येते. एवढी कर्जे आणि हप्ते असल्यावर बचत आणि गुंतवणुकीचा विचारही माणूस करू शकत नाही. कर्जांची संख्या कमी करणे, लवकरात लवकर सगळी कर्जे फेडणे यालाच त्याचा स्वाभाविक प्राधान्य राहते. या परिस्थितीत त्या व्यक्तीला आर्थिक ताणाबरोबरच असह्य असा मानसिक ताण जाणवू लागतो.

अशा स्थितीत अनेकजण पूर्णपणे एकाकी राहू लागतात. कर्ज ही त्यांच्यासाठी मोठी बिकट समस्या बनलेली असते. क्रेडिट कार्डवरील कर्ज असेल तर ते सगळ्यात फास आवळणारे असते. कारण या कर्जावरील व्याज कितीतरी पटीने वाढत राहते. मूळ कर्जाच्या रकमेपेक्षा व्याज जास्त होऊन बसते. अशा वेळी मग मित्रांकडून, नातेवाईकांकडून कर्जरुपाने किंवा उसने पैसे घेतले जातात. हे मार्ग बंद झालेले असले तर खासगी सावकाराकडे हात पसरावे लागतात. खासगी सावकार तुमचा क्रेडिट स्कोअर किंवा तुमच्यावर आधी किती कर्ज आहे हे तपासण्याच्या भानगडीत पडत नाहीत.

मग या कर्जांमुळे मित्र, नातेवाईकांना भेटणे, कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे अवघड बनते. आता तुमच्या क्रेडिट स्कोअरची आणि कर्जांची सगळी माहिती सगळ्याच कर्जदार कंपन्या शेअर करत असल्याने कायदेशीर काम करणाऱ्या कंपन्यांकडून कर्ज मिळणे मुश्किल होऊन बसलेले असते. अशा स्थितीत बचतीची दीर्घकालीनउद्दीष्टे निश्चित करून अशा कर्जदाराने पुढील गोष्टी करणे अपेक्षित असते. तरच तो या संकटातून बाहेर पडू शकतो.

कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठीचे मार्ग (भाग-२)

नवीन कर्जाला ठाम नकार…

पहिली गोष्टी म्हणजे इतकी कर्जे असताना नवीन कुठलेही कर्ज घ्यायचे नाही. जुनी कर्जे फेडण्यासाठी नवीन कर्ज घेणे म्हणजे कर्जाच्या सापळ्यात कायमस्वरुपी राहण्याचा निर्णय घेण्यासारखे असते. कर्जाची परतफेड आपल्या कमाईतूनच करायची आहे हे मनाशी स्पष्ट केले पाहिजे. मग कमाई कितीही कमी असली तरी प्रथम सगळ्यात जास्त व्याजदर असलेल्या कर्जाची परतफेड करायची आणि त्याचवेळी कमाई वाढेल यासाठी प्रयत्न सुरु करायचे. अनेक पुरुषांना हे सगळे पत्नीला कसे सांगायचे असा गहन प्रश्न असतो. त्यामुळे पत्नीने काही व्यवसाय-नोकरी करून कुटुंबाची कमाई वाढवण्याचा मार्ग विचारात घेतला जात नाही. खरे तर कुटुंबाची कमाई, खर्च, बचत, कर्ज या सगळ्यांची माहिती पती-पत्नी दोघांनाही असणे गरजेचे असते. पैशासंदर्भातील सगळे निर्णय दोघांनी बसून घ्यायचे असतात.

– चतुर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)