कर्जाच्या बहाण्याने पाच लाखाची फसवणूक

सातारा – कमी व्याजाने कर्ज मिळवुन देतो, असे सांगत पाच लाखाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात सात जणांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. ज्ञानदेव साळु काळे (रा.शाहूपुरी,सातारा) यांनी तक्रार दिली आहे.

तक्रारदार काळे यांना काही दिवसापुर्वी एक फोन आला होता. त्यावेळी तुम्हाला बजाज फायनान्स कंपनीकडून कमी व्याजाने कर्ज मिळवुन देतो असे सांगितले होते. त्यावर विश्‍वास ठेवत काळे यांनी संबधिताने दिलेल्या मेल ऍड्रेसवर सर्व कागदपत्रे पाठवली. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना फोन आला. तेव्हा समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने तुमचे कर्ज मंजुर झाले आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला बजाजची विमा पॉलीसी काढावी लागेल असे सांगितले.

काळे यांनी त्यासाठी लागणारे पैसे संबंधीताच्या बॅंक खात्यावर पाठवले. काही काळ गेल्यानंतर काळे यांना परत फोन आला. तेव्हा सांगण्यात आले की, तुमची पॉलीसी अपडेट झाली आहे. मात्र कर्जासाठी लागणारी नोंदणी झाली नाही.
त्यामुळे नोंदणी फी भरावी लागेल. काळे यांनी पुन्हा नोंदणी फी म्हणून व कर्जाचा मिळणारा धनादेश यासाठी म्हणून संबंधीताच्या बॅंक खात्यावर पुन्हा पैसे पाठवले. पॉलीसी व नोंदणी फी असे एकुण दोन लाख पन्नास हजार रुपये काळे यांनी भरले होते.

त्यानंतर काळे यांना संबंधीतानी कर्ज, पॉलीसी, नोंदणी झाल्याची काही कागदपत्रे मेलद्वारे पाठवली. कागदपत्रे आली पण कर्ज मिळत नसल्याने काळे यांनी संबंधीतांना वेळोवेळी फोन केले, असता संबंधीताचा संपर्क झाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)