कर्जाच्या बहाण्याने एकाची फसवणूक

पिंपरी,  (प्रतिनिधी) – कर्ज देण्याच्या बहाण्याने एकाची 76 हजाराची फसवणूक केली. दुर्गामाता कॉलनी, भोसरी येथे नुकताच हा प्रकार घडला. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश पांचाळ (वय 32, रा.भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अज्ञात मोबाईल धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांचाळ यांच्या मोबाईलवर फोन आला. तुम्हाला कर्ज उपलब्ध करुन देतो, असे सांगितले. कर्ज मिळवण्यासाठी त्या व्यक्तीने पांचाळ यांच्याकडून 76 हजार 500 रुपये ऑनलाईन पाठवण्यास सांगितले. मात्र, कोणतेही कर्ज न मिळता पांचाळ यांची फसवणूक केली.

पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)