कर्जवसुलीसाठी चक्क प्रवाशांनी भरलेल्या बसचे अपहरण

कर्नाटकमधील घटना: फायनान्स कंपनीचे चार कर्मचारी ताब्यात
बंगळूर – कर्जवसुलीसाठी चक्क प्रवाशांनी भरलेल्या बसचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमध्ये घडली. संबंधित गुन्ह्याबद्दल एका फायनान्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

बंगळूरमधून शुक्रवारी रात्री एक खासगी बस केरळकडे निघाली. बसमध्ये 42 प्रवासी होते. त्या बसला बंगळूरमधून बाहेर जाण्यापूर्वीच दुचाकींवरून आलेल्या चौघांनी रोखले. गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी चालकाला बस एका गोदामात नेण्यास सांगितले. या प्रकारामुळे प्रवासी भयभीत झाले. एका प्रवाशाने प्रसंगावधान दाखवत पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी मोबाईल दूूरध्वनीवरून संपर्क साधला. काही वेळेतच सुमारे 30 सशस्त्र पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बस थांबवण्यात आलेल्या गोदामाला घेरून ती रोखणाऱ्या चौघांपैकी एकाला तातडीने पकडले. घटनास्थळावरून पलायन करणाऱ्या इतर तिघांना काही तासांत ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आणि बस अपहरणामागील कारण उलगडले.

अटक करण्यात आलेल्या चौघांनी ते एका फायनान्स कंपनीच्या वसुली पथकाचे कर्मचारी असल्याचे सांगितले. संबंधित फायनान्स कंपनीने बसच्या मालकाला कर्ज दिले होते. मात्र, तो नियमितपणे कर्जाचा हफ्ता भरत नव्हता. त्यामुळे बस ताब्यात घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही, अशी माहिती संबंधित कर्मचाऱ्यांनी दिली. अर्थात, कर्जवसुलीसाठीचा धाडसी फंडा त्या कर्मचाऱ्यांच्या अंगलट आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)