कर्जरोख्यांवर 26 कोटींचे ‘प्रोत्साहन’

केंद्र शासनाकडून अनुदान : ‘अमृत’ योजनेतून निधी

पुणे – महापालिकेकडून शहराला समान पाणी पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या समान पाणी योजनेस सुमारे 200 कोटींचे कर्जरोखे काढले आहे. विकासकामांसाठी असे कर्जरोखे काढणारी पुणे ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली. त्यामुळे केंद्रशासनाकडून महापालिकेस या कर्जरोख्यांवर तब्बल 26 कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले आहे.

हे अनुदान महापालिकेस वितरीत करण्याचे आदेश राज्यशासनाने दोन दिवसांपूर्वी काढले आहेत. दरम्यान, या योजनेचे काम अजून सुरू झालेले नसल्याने ही कर्जरोख्यांची रक्कम राष्ट्रीयकृत बॅंकेत मुदत ठेवीमध्ये ठेवण्यात आली आहे. महापालिकेकडून सुमारे 2 हजार 515 कोटी रूपयांची समान पाणीपुरवठा योजना राबविली जाणार आहे. या योजनेसाठी सुमारे 1 हजार कोटींचे कर्जरोखे उभारले जाणार असून त्यातील 200 कोटींचे कर्जरोखे उभारण्यात आले आहेत. याची दखल केंद्रशासनाने घेतली असून या कर्जरोख्यांवर पालिकेस केंद्राच्या “अमृत’ योजनेतून 26 कोटींचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले आहे.

मागील महिन्यातच लखनऊ येथे झालेल्या स्मार्ट सिटीच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महापालिकेस या कर्जरोख्यांसाठी विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही ही अनुदानाची रक्कम पालिकेस प्राप्त झालेली नव्हती. त्यामुळे पालिकेने केंद्रीय नगरविकास विभागास पत्र पाठवून या निधीबाबत विचारणा केली होती, त्यानंतर शासनाकडून तत्काळ हा निधी राज्यशासनास पाठवून तातडीने महापालिकेस वितरीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, ही रक्कम पुढील आठवड्यात पालिकेस मिळणे अपेक्षीत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)