कर्जमाफी तोडगा नसून, कृषी मालास हमीभाव हवा- शिवराजसिंह चौहान

साईंचे सहपरिवार घेतले दर्शन

शिर्डी: देशातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा कायम स्वरूपीचा तोडगा नसून, त्यांच्या उत्पादनला योग्य भाव देण आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, हे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शिर्डीत केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नववर्षाच्या पूर्व संध्येला मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चौहान यांनी दरवर्षी प्रमाणे आपल्या परिवारासह साईंचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विश्‍वस्त सचिन तांबे, डॉ. राजेंद्र पिपाडा, भाजपचे तालुका सरचिटणीस रवींद्र गोंदकर आदींसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चौहान यांनी परिवारासह दुपारी साई मंदिरात माध्यान्ह आरतीस हजेरी लावून साई समाधीचे दर्शन घेतले.

यावेळी पत्रकारांशी दिलखुलासपणे बोलताना चौहान म्हणाले, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा कायम स्वरूपीचा तोडगा नसून, त्यांच्या उत्पादनला योग्य भाव देणे आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट करणे महत्त्वाचे आहे. फोडाफोडी करून सरकार बनवून सत्ता मिळवणे हे माझ्या अंतरात्म्याला मान्य नव्हते. आगामी काळात मध्यप्रदेशमध्ये नव्याने स्थापन झालेल्या सरकार विरोधात अविश्‍वास ठराव होणार असून, कोणत्याही प्रकारे तांडव होणार नसल्याचे सांगत 2019 मध्ये पुन्हा देशात नरेंद्र मोदींचेच सरकार येणार असून, त्यासाठी आपण साईबाबांकडे प्रार्थना केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मध्यप्रदेशात कॉंग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या कारभाराबद्दल विचारले असता, ते म्हणाले, मुख्यमंत्री कमलनाथ यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला असून, आमच्या पक्षाची सकारात्मक भूमिका असून, त्यांनी राज्याच्या हितासाठी चुकीचे निर्णय घेतले, तर जोरदार विरोध करू. यावेळी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकाने राबविलेल्या पाणी अडवा, पाणी जिरवा या जल अभियानाचे चौहान यांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)