कर्जमाफी करा, मगच ध्वजारोहण करा – सुकाणू समिती

14 ऑगस्टला राज्यभर चक्का जामचा इशारा

मुंबई – शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा तीव्र करण्याचा इशारा सुकाणू समितीने दिला आहे. 15 ऑगस्टला पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करु देणार नाही. 14 ऑगस्टला राज्यभर चक्का जाम करु, असा इशारा सुकाणू समितीने दिला. तसेच जिल्ह्यातील पालकमंत्री राज्य शासनाचे प्रतिनिधी असल्याने त्यांच्या ऐवजी शेतकऱ्यांकडून स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

मुंबईत सुकाणू समितीच्या सदस्यांची पत्रकार परिषद झाली. आमदार बच्चू कडू, अजित नवले, रघुनाथ दादा पाटील, किशोर ढमाले यांची या पत्रकार परिषदेला उपस्थिती होती.

कर्जमाफी करा आणि मगच ध्वजारोहण करा, असे सुकाणू समितीने सांगितले. सरकारने कर्जमाफी केली नाही, शिवाय इतर मागण्यांवरही गांभीर्याने विचार केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात चक्का जाम करु, असा इशारा सुकाणू समितीने दिला.

सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र सरकारचे निकष आणि जाहीर केलेल्या कर्जमाफीला सुकाणू समितीचा विरोध आहे. त्यामुळे वारंवार मागणी करुनही सरकारने गांभीर्याने विचार न केल्यामुळे सुकाणू समितीने आता राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)