कर्जमाफी करा किंवा खात्यात 15 लाख भरा

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी

नाशिक: महाराष्ट्रात सरकार बदल होऊन अडीच वर्षे झाली, मात्र राज्यात काहीच बदलले नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, आम्ही बाहेरुन विनाशर्त पाठिंबा देतो, कर्जमाफी केल्यास सरकारला धक्का लागू देणार नाही, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच सत्तेला लाथ मारायला मला एका क्षणाचाही विलंब लागणार नसल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपला एकप्रकारे इशाराच दिला असल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.
निवडणुकीपूर्वी काळा पैसा भारतात आणू, त्यामुळे प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील असे सांगितले जात होते, मात्र एक पैसाही आला नाही. आता शेतकऱ्याची कर्जमाफी करा किंवा त्याच्या खात्यात 15 लाख रुपये भरा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच समृद्धी महामार्गाच्या विरोधता शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनता शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. तसेच माझ्याकडे देण्यासारखे काहीच नाही फक्‍त पाठींबाच देवू शकतो आणि तोच द्यायला मी इथे आलो आहे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे या मेळाव्याला शिवसेनेच्या आमदार-खासदारांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टीही उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. गाडीवरचा दिवा गेला पण यांच्या मनातला गेला नाही. दानवेंच्या वक्तव्याने तळपायाची आग मस्तकात गेली. आता शेतकरी रडणार नाही साल्यांची सालपटे काढतील, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)