कर्जमाफीसाठी सहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग

संग्रहित फोटो

पुणे, दि.8 – राज्य शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेमध्ये सहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग वाढला असल्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

राज्यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली. याचा आतापर्यंत 48 लाख शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून त्यांच्या कर्जमाफीची रक्कम बॅंक खात्यात जमा करण्यात सरकारला यश आले आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी राज्य शासनाने कर्जमाफीच्या योजनेत कुटुंब हा घटक वगळून शेतकरी खातेदारांचा ही समावेश केला होता. त्यामुळे यामध्ये सहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

-Ads-

या नव्याने यादीत समाविष्ट झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असून त्याबाबतची कार्यवाही लवकरच पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत 16 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचेही देशमुख यांनी सांगितले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
18 :thumbsup: Thumbs up
18 :heart: Love
7 :joy: Joy
12 :heart_eyes: Awesome
4 :blush: Great
13 :cry: Sad
20 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)