कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी 1 मेपर्यंत मुदतवाढ

मुंबई  – छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी काही कारणास्तव ज्या शेतकऱ्यांना अर्ज करता आले नाही, त्यांच्यासाठी पुन्हा दि. 1 मे 2018 मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे जाहीर केला. या निर्णयामुळे वंचित राहिलेले पात्र शेतकरी अर्ज करु शकतील.यापूर्वी योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दि.14 एप्रिल 2018 पर्यंत वाढविण्यात आली होती.

मात्र पात्र शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याकरिता आज मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा अर्ज करण्याची मुदत वाढविली आहे. वन टाईम सेटेलमेन्ट योजनेसाठी यापूर्वीच दि.30 जून 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत 14,388 कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे. यात 46 लाख 52 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्याचा दावाही सरकारने केला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)