कर्जमाफीसाठी शेतकरी विधानभवनावर धडकणार 

मुंबई: हिवाळी अधिवेशन सुरु असताना सरकारला पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या रोषाला तोंड द्यावे लागणार आहे. मुंबईतल्या आझाद मैदानात उद्या हजारोंच्या संख्येने शेतकरी धडक देणार आहेत. हे आंदोलन “लोकसंघर्ष’च्या वतीने केले जाणार आहे.

कर्जमाफी, दुष्काळ निवारण आणि आदिवासींच्या समस्यांसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आझाद मैदानात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, असे अशी माहिती आंदोलक शेतकऱ्यांनी दिली आहे.

-Ads-

या आंदोलनासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने शेतकरी काल रात्री ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यांनी आज सायनच्या सोमय्या मैदानात मोर्चा काढला असून शेतकरी उद्या आझाद मैदानात दाखल होणार आहेत. ठाण्यापासून 45 किलोमीटरचे अंतर पार करुन शेतकरी विधानभवनावर धडकणार आहेत.

यावेळी ज्येष्ठ न्यायाधीश बी. जे. कोळसे-पाटील अध्यक्ष असून जलपुरुष राजेंद्र सिंग, कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव, सुभाष वारे, स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, काळू राम काका दोधडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यात राष्ट्र सेवादला, भारत बचाव आंदोलन, विद्यार्थी भारती संघटनांसह विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)