कर्जमाफीचा विचार नाही – जेटली

नवी दिल्ली, दि. 20 – देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा कोणताहीं प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटले आहे. पंजाब सरकारने आज आपल्या राज्यातील दहा लाख शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करण्याचा निर्णय घोषित केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय पातळीवरूनच केंद्र सरकारतफे शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी पुढे केली जात आहे. त्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले केंद्र सरकारला आर्थिक शिस्त पाळणे कायद्यान्वये आवश्‍यक असून वित्तीय तुट आटोक्‍यात ठेवणेही सरकारसाठी आवश्‍यक असते. त्यामुळे कर्जमाफी सारखा विषय आमच्यापुढे नाही.
वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन समितीने अर्थसंकल्पातील वित्तीय तुट 3 टक्‍क्‍यांच्या आत ठेवण्याची सुचना सरकारला केली आहे. 2020 सालापर्यंत हे उद्दीष्ठ गाठण्यास सरकारला सांगण्यात आले असून 2022-23 पर्यंत हे प्रमाण 2.5 टक्के इतके खाली आणण्याची समितीची शिफारस ्रआहे. त्यामुळे आर्थिक शिस्तीला महत्व द्यावे लागत असल्याचे कारण जेटली यांनी पुढे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)