कर्जबुडव्या विजय मल्ल्या अखेर फरार घोषित

मुंबई: बॅंकाचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या उद्योगपती विजय मल्ल्या याला आज अखेर मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए न्यायालयने “फरार आर्थिक गुन्हेगार’ म्हणून घोषित केले आहे. या कायद्यातील नव्या सुधारणेनंतर फरार घोषित केलेला विजय मल्ल्या हा पहिला गुन्हेगार ठरला आहे.

फरार आर्थिक गुन्हेगार कायदा 12(1) नुसार मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एमएस आझमी यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निकाल दिला आहे. मल्ल्याला फरार घोषित करण्यासाठी ईडीची याचिका फरार आर्थिक गुन्हेगार न्यायालयाने स्वीकारली आहे. यामुळे मल्ल्याच्या मालमत्तेवर टाच आणण्याच्या दिशेने तपास यंत्रणेने पहिले यशस्वी पाऊल टाकले आहे. जप्तीच्या या कारवाईवर याच न्यायालयात येत्या 5 फेब्रुवारीपासून युक्तिवाद सुरू होणार आहे. कारण मल्ल्याची बरीचशी संपत्ती ही बॅंकाकडे तारण आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवीन कायद्यांतर्गत ज्यांना “फरार आर्थिक गुन्हेगार’ म्हणून घोषित केले जाते, त्यांची मालमत्ता तातडीने जप्त केली जाते. गुन्हा केल्याबाबत त्याच्याविरोधात अटक वॉरंटही जारी केले जाते. त्यास “फरार आर्थिक गुन्हेगार’ ठरवले जाते. या अध्यादेशांतर्गत 100 कोटी रुपयांहून अधिक रक्कमेची फसवणूक, कर्जाचा परतावा न करणे यासारखी प्रकरणे येतात.
दरम्यान, “किंगफिशर एअरलाइन्स’च्या नावे घेतलेली बॅंकांची सुमारे 9,000 हजार कोटी रुपयांची कर्ज बुडवून विजय मल्ल्या इंग्लंडमध्ये पसार झाला आहे. मल्ल्या देशाबाहेर पळून गेल्याने भारत सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. तेव्हापासून मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)