कर्जबाजारीस कंटाळून तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

नांदेड – कंधार तालुक्‍यातील उस्माननगर येथील मन्मथ बाबुराव डांगे (38) या तरूण शेतकऱ्याने कर्जबाजारीस कंटाळून विषारी औषध प्राशण करून आत्महत्या केल्याची घटना 24 ऑगस्ट रोजी घडली. उपचारादरम्यान नांदेड येथील शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला.

अधिक माहिती अशी की, मन्मथ डांगे हा उस्माननगर येथील तरूण शेतकरी असून एकत्रीत कुटूंब पद्धती असून 3 एकरच्या जवळपास शेती आहे. या शेतीवर सर्व कुटूंबाची उपजिवीका आहे. सततची नापिकी आणि नेहमीचा दुष्काळ व वडिलांच्या नावाने असणारे बॅंक कर्ज अशा या सर्व त्रासास कंटाळून मन्मथ डांगे स्वत:च्याच शेतात पिकांवर फवारणारे विषारी औषध प्राशन केले असता त्याला उपचारासाठी विष्णुपूरी येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)