कर्जफेड आधी की गुंतवणूक? (भाग-१)

कर्ज फेडण्याआधीच आर्थिक उद्दीष्टांसाठी गुंतवणुकीला सुरवात करावी की या गोष्टी एकापाठोपाठ एक कराव्यात?

अनेक कर्जदारांच्या मनात याबाबत द्विधा मनस्थिती असते. पारंपारिक शहाणपण आपल्याला असे सांगते की, पहिल्यांदा कर्ज फेडून टाकलेले चांगले. डोक्यावर कर्ज नसले की मानसिक शांती लाभते. अर्थात यात कुठलीच शंका असण्याचे कारण नाही. पण अशा प्रकारच्या मनशांतीमुळे तुम्ही पुढची कित्येक वर्षे म्हणजे किमान दहा-पंधरा वर्षे तुम्हीगुंतवणूक करणार नसता.

हे शहाणपणाचे आहे का?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याचे उत्तर नाही असेच आहे. कारण लवकर गुंतवणूक सुरू करण्यातून तुम्हांला चक्रवाढीचा फायदा मिळणार असतो आणि त्यातून एक घसघशीत रक्कम उभी राहणार असते. मुख्य म्हणजे तुमच्या कमाईवर कर्जफेड आणि आर्थिक उद्दीष्टे यांचा सारखाच हक्क असतो. पण सामान्य माणसाच्यादृष्टीने कर्ज वेळेआधी नाही तरी किमान वेळेत फेडण्याला पहिले, याला प्राधान्य असते. दुसरीकडे आर्थिक उद्दीष्टांसाठी पैशाची गरज लागणारच असते. त्याकडे हळूहळू दुर्लक्ष होते आणि मग भविष्यातील गरजा आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी तुमची आर्थिकदृष्ट्या तयारी झालेली नसते. हे जास्त धोकादायक असते. त्यामुळे कर्जफेड आणि गुंतवणूक यात संतुलन साधणे आवश्यक असते.

कर्जाची परतफेड किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी आपण ऐनवेळच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी किती तयार आहोत याचे मूल्यमापन केले पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे राखीव निधी किती आहे, याचाही विचार केला पाहिजे. ऐनवळेच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी फार मोठा निधी असला पाहिजे असे नव्हे, परंतु किमान सहा महिने घरखर्च चालेल एवढी रक्कम असली पाहिजे. अचानक समोर ठाकणाऱ्या परिस्थितीसाठी तुम्ही काहीच बचत/तरतूद केली नसेल तर कर्ज आधी फेडण्याचा किंवा गुंतवणुकीचा विचार सोडा आणि अचानक समोर ठाकणाऱ्या परिस्थितीसाठी काही पैशाची बचत करून ठेवा.

आता आपण कर्जफेड आधी की गुंतवणूक याचा विचार करू. यासाठी दोन मुद्यांचा विचार करावा लागतो.

1)    करसवलत वजा करून कर्जावर आकारले जाणारे व्याज

2)    गुंतवणुकीवरील परताव्यावर कर भरल्यानंतर हाती पडणारी रक्कम

तुमच्या नावावर एकापेक्षा जास्त कर्जे असतील तर त्याची यादी करा. किती कर्ज शिल्लक राहिले आहे, व्याजाचा जर, कालावधी आणि मिळणारी करसवलत (असल्यास) असे प्रत्येक कर्जापुढे लिहून काढा.

साधारणपणे पर्सनल लोनचा व्याजदर 15 टक्के असतो. कार लोनचा 11 ते 13 टक्के आणि क्रेडीट कार्डच्या थकबाकीवरील व्याज आकारणी 30 ते 40 टक्के दराने केली जाते.

अशा प्रकारचे कुठलेही कर्ज तुमच्यावर असेल आणि मुदतीआधी कर्ज फेडण्याऐवजी तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर कमीत कमी वार्षिक 13 ते 15 टक्के परतावा देईल असा गुंतवणुकीचा पर्याय तुम्हांला निवडावा लागेल. सातत्याने एवढा खात्रीशीर वार्षिक परतावा देणारे पर्याय फारसे उपलब्ध नाहीत. काही वेळा शेअर बाजारातील गुंतवणूक चांगला परतावा देते. मात्र त्यामध्ये सातत्य आणि खात्री असेलच असे नाही. त्यामुळे शेअरबाजारात गुंतवणूक केली आणि मुद्दल कमी झाले अशी स्थिती व्हायला नको.

कर्जफेड आधी की गुंतवणूक? (भाग-२)

या सगळ्यात तुमच्याकडे पर्सनल लोन असेल किंवा क्रेडिट कार्डची थकबाकी असेल तर ती सगळ्यात आधी फेडून टाका.

– चतुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)