कर्जत व जामखेडमधील गावांसाठी पाच कोटी मंजूर

पालकमंत्री शिंदे यांचा मतदारसंघात विकासकामांना वेग : सोडतीन कोटींचा निधी वर्ग

नगर – जामखेड व कर्जत तालुक्‍यातील गावातील मुलभूत सुविधा व विकासकामांसाठी पाच कोटी रूपयांच्या निधीला प्रशासकीय मंजूरी दिली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ही मंजुरी दिली. गावांतर्गत मूलभूत सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्री शिंदे यांनी जामखेड व कर्जतमधील गावांच्या विकासाकामांसाठी विशेष प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते. सन 2018-19 या आर्थिक वर्षात कर्जत व जामखेड तालुक्‍यातील 77 विविध विकासकामांसाठी 5 कोटी रकमेच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. वित्त विभागाने मंजूर निधीच्या 70 टक्‍के मर्यादेत निधी वितरण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम मंडळ अहमदनगर यांना उपरोक्‍त मंजूर निधीच्या 70 टक्‍के प्रमाणे 3 कोटी 50 लाख इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जामखेड तालुक्‍यातील-

चोंडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची कंपाऊंड बांधणे, रत्नापूर येथील स्मशानभूमी अंतर्गत पेविंग ब्लॉक बसविणे, महारुळी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, जातेगांव ते काळेवस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, तरडगांव येथे घाट बांधणी करणे, दौडाचीवाडी येथे मारुती मंदीर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, पिंपळगांव आ येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, आपटी येथे स्मशानभूमी बांधकाम करणे, पिंपळगांव येथे चान्नाप्पा मंदीर कंपाऊंड बांधणे, तेलंगशी येथे शाळेची कंपाऊंड बांधणे, मौजे खर्डा येथे बसस्थानक ते खडकपुरा चौक रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, मोहा (हापटेवाडी) येथे सभामंडप बांधणे,

मोहा (रेडेवाडी) येथे सभामंडप बांधण, रत्नापूर (सांगवी) येथे गाव अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे, सतेवाडी येथील मारुती मंदीर सभामंडप बांधकाम करणे, चोभेवाडी येथील गाव अंतर्गत सभागृह बांधणे, जवळके येथील ग्रामपंचायत समोरील जागेत पेविंग ब्लॉक बसविणे, नायगाव येथील आनंदवाडी नायगाव रस्ता ते मारुती मंदीर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, नागोबाची वाडी येथे भगवान बाबा मंदिरासमोर पेविंग ब्लॉक बसविणे अशा विविध विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

कर्जत तालुक्‍यातील- चिलवडी येथे हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधणे, थेरवडी येथे श्रीकृष्ण मंदीर कळम वृक्षासमोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, बेनवडी येथे बेनवडी गावांतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, माही येथे व्यायाम शाळा उभारणे व साहित्य पुरविणे, तरडगांव येथे तरडगांव ग्रामपंचायत कार्यालयासमोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, तोरकडवाडी येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, तिखी येथे हौसराव शिंदे वस्ती ते बेलगांव-मिरजगांव रोड मुरमीकरण करणे, भोसा येथे व्यायामशाळा साहित्य देणे, शिंपोरा येथे स्मशानभूमी बांधकाम करणे, रुईगव्हाण अंतर्गत नाथाचीवाडी येथे राधेकृष्ण मंदिरासमोर सभामंडप बांधणे, नागलवाडी येथे हायमास्ट दिवे बसविणे, निमगांवडाकू गावांतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, गणेशवाडी येथे नदीघाट बांधणे, ज्योतिबावाडी येथे ज्योतिबासमोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, कापरेवाडी शिंदेवाडी गावांतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, चांदे खुर्द्र गावांतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, नांदगांव येथे स्मशानभूमी बांधकाम करणे,

शिंपोरा येथे मानेवाडी विठ्ठल मंदीरासमोर सभामंडप बांधणे, वालवड येथे जिल्हा परिषद शाळेस वॉल कंपाऊंड करणे, धांडेवाडी येथे जिम्नॅशियम हॉल बांधणे व साहित्य देणे, कुंभफळ येथे सभागृह बांधणे, निंबोडी वस्ती शाळेकडे जाणारा रस्ता खडीकरण करणे, शितपूर येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, मलठण येथे आनंदवाडी-पवारवाडी रस्ता मुरमीकरण करणे, म्हाळंगी येथे म्हाळंगी ते जगताप वस्तीदरम्यान मोरी बांधकाम करणे, निंबे येथे निंबे ते डोंबाळवाडी दरम्यान बांधकाम करणे, खातगांव येथे खातगांव ते फुंदेवस्ती दरम्यान मोरी बांधकाम करणे, पाटेवाडी येथे पाटेवाडी रस्ता ते कदम वस्ती दरम्यान मोरी बांधकाम करणे, पाटेवाडी,

येथे पाटेवाडी ते जळकेवाडी फाटा दरम्यान मोरी बांधकाम करणे, बहिरोबावाडी -तांदळेवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेस वॉल कंपाऊंड बांधणे, बहिरोबावाडी गावठाण येथील शाळेस संरक्षक भिंत बांधणे, नवसरवाडी जगताप वस्ती येथील शाळेस वॉल कंपाऊंड बांधणे, झिंजेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेस वॉल कंपाऊंड बांधणे, पाटेवाडी कदमवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेस वॉल कंपाऊंड करणे, पाटेवाडी खंडोबावस्ती येथील जिल्हा परिषद शाळेस वॉल कंपाऊंड करणे, चापडगांव शिंदेवस्ती ते जिल्हा परिषद शाळा रस्ता मुरमीकरण करणे, निमगांव गांगर्डा येथे भैरवनाथ समोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, थेरगांव गावांतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, बेलगांव गावांतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, घुमरी सभामंडप बांधणे, घुमरी हनुमान वस्ती ते गवळी वस्तीरस्ता मुरमीकरण करणे, तिखी बोबडेवस्ती ते चोपान (मळई) पर्यंत मुरमीकरण करणे, तिखी हरिजनवाडा तालीमपासून ते खरपुडे वस्ती रस्ता मुरमीकरण करणे, काळेवाडी ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, चखालेवाडी गावांतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, खुरंगेवाडी सभामंडप बांधकाम करणे, चांदे खुर्द्र मारुती मंदीरसमोर सुशोभिकरण करणे, जलालपुर म्हसोबा देवस्थान येथे सभामंडप बांधणे, बारडगांव दगडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुशोभिकरण करणे, चांदे बुद्रुक सावतामाळी मंदिरासमोर सभामंडप बांधकाम करणे, राक्षसवाडी खुर्द्र गावठाण हद्दीत सभामंडप बांधकाम करणे, कापरेवाडी खुर्द्र डिसलेवस्ती-गायकवाड वस्तीरस्ता खडीकरण करणे, करपडी भैराबा सायकरवस्ती येथे सावतामाळी मंदिरासमोर सभामंडप बांधकाम करणे, मुळेवाडी दत्त योगीराज संस्था मुळेवाडी येथे सभामंडप बांधकाम करणे, बर्गेवाडी ते गुऱ्हाळ वस्ती रस्ता मुरमीकरण करणे, बेनवडी येथे सभामंडप बांधकाम करणे व थेरवडी गांव ते चिलवान वस्तीरस्ता खडीकरण करणे अशा विविध विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)