कर्जत येथील 400 केव्ही वीज उपकेंद्राला मंजुरी

ना. शिंदे यांचा पाठपुरावा ; 195 कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रसिध्द

नगर:  कर्जत तालुक्‍यातील देऊळवाडी येथे 400 केव्ही वीज उपकेंद्राच्या कामांसाठी 368 कोटी रूपयांच्या निधीला मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यापैकी 195 कोटी 15 लाख रुपयांच्या कामांची निविदा प्रसिध्द झाली आहे. तुकाई चारी पाठोपाठ कर्जतच्या 400 केव्ही उपकेंद्राचा विषय तत्काळ मार्गी लागला आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या उपकेंद्राच्या कामाला निधी उपलब्ध करून दिला आहे.
कर्जत तालुक्‍यातील वीज उपकेंद्रासंदर्भात पालकमंत्री शिंदे यांच्या विनंतीवरून 10 जानेवारी रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी याबाबत महापारेषणच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पालकमंत्री शिंदे यानंतर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. अहमदनगर जिल्हयात बाभळेश्‍वर येथे 400 केव्ही उपकेंद्र आहे. या एका केंद्रावरच जिल्ह्यातील वीजपुरवठा करताना अतिरिक्त भार पडत होता. ही अडचण सोडविण्यासाठी आणखी एवढयाच क्षमतेच्या उपकेंद्राची आवश्‍यकता होती. पालकमंत्री शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत तालुक्‍यातील देऊळवाडी शिवारातील 17 हेक्‍टर शासकीय जमिनीवर हे उपकेंद्र उभे राहणार आहे. यासाठी 368 कोटी रूपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आली असून त्यापैकी 195 कोटी 15 लाख रूपयांच्या कामांची निविदा तातडीने प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्‌ राज्य विद्युत पारेषण कंपनीकडे काम पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. उपकेंद्राच्या कामाला प्रारंभ होणार असून 24 महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे.

औद्योगिक विकासाला वीज उपलब्ध होणार

या उपक्रेंद्रामुळे कमी दाबाच्या अडचणी दूर होतील. शिवाय शेवटच्या ग्राहकापर्यंत उत्तम दर्जाची वीज पोहचणार आहे. शेती, औद्यौगिक तसेच घरगुती वापरासाठी या उपकेंद्रामुळे उच्च दर्जाची वीज निर्माण होणार आहे. त्यामुळे भविष्यात या उपक्रेंद्रामुळे औद्यौगिक विकासाला चालना मिळणार आहे. कर्जत- जामखेड तालुक्‍यासह नगर जिल्ह्याला या उपकेंद्राचा मोठा लाभ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)