कर्जत कचराडेपो भिंत कामाला तहसीलदारांची खीळ

कर्जत – शहरातील कचरा डेपोच्या संरक्षक भिंत कामाला तहसीलदारांमुळे खीळ बसल्याचा आरोप नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी केला.
राऊत म्हणाले, शहरासाठी कचरा डेपोकापरेवाडी वेशी लगत गट नंबर 5 मध्ये 25 ते 30 वर्षांपासून आहे. ही जागा कान्होला नदी पात्रालगत आहे. सध्या कान्होला नदी पात्रात जलयुक्‍त शिवार योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात काम झालेआहे. नदीपात्रात मोठा जलसाठा आहे. कचरा डेपो लगत दक्षिणेस ढेरेमळा आणि पश्‍चिमेस कापरेवाडी रस्ता आहे. आता अस्तित्वात असणाऱ्या कचरा डेपोला संरक्षक भिंत नसल्यामुळे कचरा रस्त्यावर येत आहे.

हा कचरा नदीपात्रातील पाण्यात जात आहे. त्यामुळे नदीपात्र परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कचरा डेपोला संरक्षक भिंत बांधण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी तहसीलदारांकडे बांधकाम करण्याविषयी अभिप्राय मागितला होता. परंतुतहसीलदारांनी संरक्षक भिंत बांधकाम करण्याचा अभिप्राय दिला नाही. यामुळे कचरा डेपोसंरक्षक भिंत बांधकाम करण्याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे, असेराऊत यांनी सांगितले. तहसीलदारांशी या विषयावर पत्र व्यवहार करण्यात आला. या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याचेदर्शवण्यात आले. तहसीलदारांनी कचरा डेपो सरंक्षक भिंती बांधकामाबाबत ताबडतोब अभिप्राय न दिल्यास 10 सप्टेंबरपासून कर्जत शहरातील सर्वकचरा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात टाकला जाईल, अशा इशारा नगराध्यक्ष राऊत यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)