कर्जतमध्ये 9 जणांना जुगार खेळताना अटक

शिक्षकांचा समावेश- 23 हजार रुपयेजप्त

कर्जत – येथील शारदा नगरीत जुगार खेळताना 9 जणांना अटक करण्यात आली. यात प्राथमिक शिक्षक बॅंकेचेसंचालक व प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. येथेप्राथमिक शिक्षकांची शारदा नगरीत वसाहत आहे. बुधवारी दुपारी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांना शारदा नगरी वसाहतीत जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली.

यानंतर साहाय्यक पोलीस निरीक्षक शहादेव पालवे, शिपाई सचिन वारे, अमोल मरकड, हवालदार नरसिंग शेलार यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी 9 जणांना जुगार खेळताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून 23 हजार 290 रूपये, जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेचे संचालक शरद श्‍यामराव सुद्रिक, राशीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचेमुख्याध्यापक विठ्ठल लक्ष्मण पवार, प्राथमिक शिक्षक राजेंद्र निवृत्ती सरोदे, शांतीलाल किसन गवारे, संजय आंबादास ठोकळ, राजू शांताराम सकट, गणेश माधव जाधव, परशुराम भिमराव सुपेकर, दादा बाळू कांबळे यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी सचिन मधुकर वारे यांनी फिर्याद दिली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)