कर्जतच्या रस्त्यांसाठी 10 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर

पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या प्रयत्नाने निधी उपलब्ध

कर्जत – राज्य शासनाने सन 2018-19 मध्ये रस्ते देखभाल दुरुस्ती योजनेअंतर्गत तरतुदीतून कर्जत तालुक्‍यासाठी 10 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.तालुक्‍यातील विविध रस्त्यांचे डांबरी नूतनीकरण अथवा मजबुतीकरणासाठी हा निधी मिळावा, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी विशेष पाठपुरावा केला होता. तालुक्‍यांतील रस्त्यांसाठी हा निधी देण्यात आल्याने आता पावसाळ्यात होणारी नागरिकांची, विद्यार्थ्यांची गैरसोय आता दूर होणार असून दळणवळणासाठी सुलभता येणार आहे.
हे रस्ते जिल्हाप्रमुख मार्गात समाविष्ट नसल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी अडचणी येत होत्या. ना.शिंदे यांनी या मार्गांना दर्जोन्नती देण्यासंदर्भात पाठपुरावा केला आणि या मार्गांची जिल्हा प्रमुख मार्गामध्ये दर्जोन्नती केली. रस्ते देखभाल दुरुस्ती योजनेतर तरतुदीतून मजबुतीकरण आणि डांबरीकरणासाठी विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत या रस्त्यांना त्यात समाविष्ट करुन निधी उपलब्ध करुन देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी पाठपुरावा केला होता. या विभागाने ही मागणी करुन तब्बल 15 कोटी एवढा निधीही मंजूर केला आहे. यापूर्वी या रस्त्यांसाठी 10 कोटी रुपये यापूर्वीच देण्यात आले होते. आता या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय ना. शिंदे यांनी केलेल्या या विशेष निधी तरतूदीसाठीच्या पाठपुराव्यामुळे आता दूर होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव (रस्ते) सु.वि. करमरकर यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांना या कामांसाठी मान्यता देत असल्याचे पत्र दिले आहे.
ना. शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत तालुक्‍यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी 10 कोटी 40 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता मिळाली आहे.त्यानुसार- निमगाव गांगर्डा ते घुमरी (0.4 किमी), घुमरी ते बेलगाव (4.6किमी), कोकणगाव ते खळगाव (4.1 किमी), कोंभळी ते कोंडाणे (4 किमी) अशा 13.10 किमी रस्त्यांच्या कामांसाठी 2 कोटी 70 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सुपा ते बहिरोबावाडी (1.6 किमी), गोयकरवाडा ते खंडाळा (1.5किमी) अशा एकूण 3.10 किलोमीटर रस्त्यांच्या कामांसाठी 80 लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. मिरजगाव ते गोदर्डी (2.65किमी) 80 लाख, राज्य मार्ग 67 ते जामदारवाडा (0.8किमी) 40 लाख, लोणी मसदपूर ते जळकेवाडी (2.7किमी) 90 लाख, धालवडी ते तळवडी (0.85किमी) 40 लाख, राशीन ते परीटवाडी (2.7किमी) 80 लाख, दुधोडी ते बेर्डी (4.2किमी) 1 कोटी 30 लाख, धुमकाई फाटा ते करमनवाडी (2.5 किमी) 70 लाख, तालुका हद्द ते खांडवी (4.7किमी) आणि रुईगव्हाण ते कोपर्डी (2.2) अशा एकूण 6.9 किलोमीटर रस्त्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. करमनवाडी फाटा ते खेड फाटा (2.85) रस्त्यासाठी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.कर्जतच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करत असलेल्या पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्यामुळे तालुक्‍यातील रस्त्यांना अच्छे दिन येणार आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)