कर्जतच्या रक्तदान, सर्व रोगनिदान शिबिराला प्रतिसाद

वाजपेयी जयंती व पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

कर्जत: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जयंती व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गंगाई हॉस्पिटल व प्रसूतीगृह यांच्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान व सर्व रोगनिदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबिरात 118 रक्त बॅगांचे संकलन झाले, तर शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली. गेल्या सहा वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमृत खराडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य शांतीलाल कोपनर, नारायण मोरे, संभाजी राजेभोसले, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, अल्लाउद्दीन काझी, भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, आबासाहेब कोल्हटकर, डॉ. मधुकर कोपनर, डॉ. योजना कोपनर, सुदर्शन कोपनर, डॉक्‍टर्स असोसिएशनचे पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी गंगाई हॉस्पिटलच्यावतीने पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. शांतीलाल कोपनर यांचे कार्य व संस्कार यातून हे कुटुंब सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर आहे. रुग्णांसाठी सुरू केलेल्या योजना सर्वसामान्य माणसाला हिताच्या ठरणार असल्याचे प्रा. शिंदे म्हणाले. डॉ. मधुकर कोपनर यांनी प्रास्ताविक केले. दर मंगळवारी ओपीडी सुविधा मोफत देणार असून, दर महिन्याच्या दहा तारखेला गर्भवती महिलांची तपासणी तसेच दुसऱ्यांदा मुलगी झाल्यास प्रसूती निम्म्या रकमेत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शांतीलाल कोपनर, अल्लाउद्दीन काझी, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, अशोक खेडकर आदी मान्यवरांची भाषणे झाली. आखोणीनजीकच्या श्री क्षेत्र जाधव वस्ती येथे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना खाऊ तसेच ग्रामस्थांना चहापानाचे वाटप करण्यात आले. देवा गृपचे अध्यक्ष काळूराम सायकर यांनी हा कार्यक्रम घेतला. मधुकर जाधव, महादेव जाधव, नाना जाधव, राजेंद्र जाधव, सुनील जाधव, राहुल जाधव यांनी सक्रीय सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)