कर्जतच्या यंग स्पोर्टस क्रिकेट क्‍लबने पटकाविला चषक

लोणावळा – क्रिकेट क्‍लब ऑफ लोणावळा व मायक्रो स्कॅन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय 19 वर्षाखालील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ट्‌वेंटी चषक रायगड येथील कर्जतच्या यंग स्पोर्टस क्रिकेट क्‍लबने जिंकला आहे. या क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना पुण्याच्या जस क्रिकेट ऍकॅडमी आणि यंग स्पोर्टस क्रिकेट क्‍लबमध्ये रंगला. शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेल्या या अत्यंत रोमहर्षक सामन्यात सहा गडी राखून यंग स्पोर्टस क्रिकेट क्‍लबने विजय मिळवला.

लोणावळा येथील रेल्वेच्या मैदानावर सुमारे 32दिवस रंगलेल्या सहावी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेट स्पर्धा व पहिली 19 वर्षाखालील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ट्‌वेंटी चषक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत राज्यातील 19 वर्षाखालील 32 नामांकित संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून जस क्रिकेट ऍकॅडमीने पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन षटकात जसच्या श्रीराम महाशिकरे व श्रेयस मिटकरी यांनी 30 धावा करून मोठया धावसंख्येच्या दिशेने झेप घेतली होती. त्यानंतर यंगच्या गोलंदाजांनी पुन्हा अचूक गोलंदाजी करत धाव संख्येवर अंकुश ठेवला. जसच्या श्रीराम व श्रेयस या दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी सात षटकात 56 धावा जमविल्या. एका बाजूने शेवटच्या चेंडू पर्यंत तळ ठोकणाऱ्या श्रीराम हा शेवटच्या चेंडूत धावबाद झाला. श्रीरामने 50 चेंडूत 83 धावा करून संघाची धावसंख्या 170 पोहचवली.

यंगच्या सलामीवीर विस्फोटक फलंदाज ओंकार गावडे आणि जागतिक विश्वविक्रमवीर प्रणव धनवडे यांनी डावाची सुरुवात केली. मात्र विश्वविक्रमवीर रचणाऱ्या प्रणवला मात्र साजेशी खेळी करता आलीच नाही. प्रणवचा गौरव शिंदेने त्रिफळा उडविला. त्यानंतर आलेल्या सिद्धार्थ म्हात्रेने धडाकेबाज खेळी करत 32 चेंडूत 53 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. ओंकार गावडेनेही आपल्या लौकिकाला साजेसा खेळत 40 चेंडूत 56 धावा केल्या. प्रतीक म्हात्रेने 23 चेंडूत 29 धावांची महत्वपूर्ण खेळी करत संघाला विषयाच्या समीप नेऊन ठेवले होते. शेवटच्या दोन चेंडूत तीन धावा अशी स्थिती निर्माण झाली. प्रतीक म्हात्रेने शेवटच्या चेंडूवर मिड ऑफला क्षेत्ररक्षकाच्या डोक्‍यावरून चेंडू सीमापार लगावत आपल्या संघाला विजयश्री मिळवून दिला.

विजेत्या संघाला रोख 50 हजार व फिरता करंडक बक्षिस देण्यात आला. स्पर्धेचा बक्षिस समारंभ क्रिकेटपटू पराग मोरे, सागर सावंत, लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय गवळी, नगरसेवक निखिल कविश्वर, बाळासाहेब पायगुडे, कलानंद प्रसाद, स्पर्धेचे मुख्य आयोजक अमित कदम, अलंकार कारके, उद्योजक अमित घेणंद, संजय मोरे, दत्ता फाले, किशोर भांगरे यांच्या हस्ते संपन्न झाला. सिद्धार्थ म्हात्रे हा सामनावीर तर ओंकार गावडे हा मालिकावीर ठरला. गौरव शिंदे सर्वोत्तम फलंदाज तर शुभम तिवारी सर्वोत्तम गोलंदाज ठरला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)