कर्करोग तपासणी शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कर्वेनगर- पुणे महापालिका, आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप व अमेनोरा येस फाउंडेशनच्या वतीने कर्वेनगरमधील कै. बिंदुमाधव ठाकरे रुग्णालयात महिलांसाठी कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या की, महिला ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबाची काळजी घेतात. त्याचप्रमाणे त्यांनी स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घेतली पाहिजे. विशेषतः महिलांमध्ये स्तन कॅन्सरचे प्रमाण वाढत असून याबाबत महिलांनी सजग राहणे व संकोच न बाळगता नियमित तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

डॉ. शेखर कुलकर्णी, डॉ. अंजली टिळेकर, मीनाक्षी भुजबळ, सिस्टर अंजली चोरघे यांच्या टीमने तब्बल 110 महिलांची तपासणी केली. उपक्रमाचे संयोजन मंजुश्री खर्डेकर यांनी केले. कविता सदाशिव यांनी गोसावी वस्तीतील महिलांना शिबिराची माहिती देऊन त्यांना तपासणी करून घेण्यास प्रेरित केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)