करूणानिधींच्या मृत्युच्या धक्‍क्‍याने 248 जणांचे गेले बळी !

चेन्नाई – तामिळनाडुत द्रमुक पक्षाचे प्रमुख करूणानिधी यांच्या निधनाचे वृत्त ऐकल्यानंतर राज्यात एकूण 248 जणांचे प्राण गेले असल्याची माहिती द्रमुक पक्षाच्यावतीने देण्यात आली. त्यांच्या चाहत्यांचे त्यांच्यावर खूप प्रेम होते. त्यामुळे त्यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांना मोठा धक्‍का बसला त्यातून हे बळी गेले असून द्रमुक पक्षाने त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रूपयांची मदत जाहींर केली आहे.

करूणानिधींच्या निधनानंतर त्याच्या धक्‍क्‍याने राज्यात मृत्युमुखी पडलेल्यांविषयी सद्‌भावना व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहणारा ठराव आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत संमत करण्यात आला. तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी दोन लाख या प्रमाणात एकूण 4 कोटी 96 लाख रूपयांची मदत देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. करूणानिधी यांचे प्रदीर्घ आजाराने 7 ऑगस्ट रोजी निधन झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)