करुळ घाटात शिवशाहीला अपघात

संग्रहित फोटो

कोल्हापूर: करूळ घाटातील भट्टीवाडीनजीक शिवशाही बस व कार यांच्यात अपघात झाला आहे. सुदैवाने दोन्ही वाहनांतील प्रवाशांना कोणत्या प्रकारची दुखापत झाली नाही. हा अपघात शुक्रवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडला. या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

प्रशांत लवू जाधव (राहणार साकेडी ता. कणकवली) कणकवली हे कार घेऊन मुंबई-पुणे-कोल्हापूर-साकेडी असा प्रवास करत होते. याचवेळी शिवशाही बस चालक अनिल परीट हे शिवशाही बस घेवून वैभववाडीहून कोल्हापूरला जात होते. करूळ घाट पायथ्याशी असलेल्या भट्टीवाडी येथे दोन्ही वाहने समोरासमोर आल्या असता शिवशाही बसचालकाचा ताबा सुटून बस समोरून येणाऱ्या कारवर धडकली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या अपघातात कार चालक बाजूकडील भागाचे नुकसान झाले आहे. शिवशाहीमध्ये 27 प्रवासी, तर कारमध्ये पाच प्रवासी होते. सुदैवाने या प्रवाशांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. या अपघाताची नोंद वैभववाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर दळवी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)