करुणानिधी यांची प्रकृती पुन्हा खालावली

चेन्नई – द्रमुकचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांची प्रकृती पुन्हा ढासळली असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी म्हटले आहे. 94 वर्षीय करुणानिधी यांना वृद्धापकाळामुळे उद्‌भवणाऱ्या विविध व्याधींवरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

करुनानिधी यांच्या महत्वाच्या अवयवांची कार्यक्षमता क्षीण झाली असून त्यांच्या स्वास्थ्यावर नियमित देखरेख केली जात आहे, असे कावेरी हॉस्पिटलच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

-Ads-

करुणानिधी यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांना पुढील 24 तासात मिळणाऱ्या प्रतिसादावर पुढील उपचार आणि निदान निश्‍चित होईल, असे हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. अरविंदन सेल्वाराज यांनी म्हटले आहे.

करुणानिधी यांच्या प्रकृतीबाबतची ताजी माहिती समजल्यावर द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हॉस्पिटलबाहेर गर्दी करायला सुरुवात केली आहे. रक्‍तदाब खालावल्याने करुणानिधी यांना 28 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)