करुणानिधी यांचा जीवनप्रवास…

पटकथा लेखक ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री

हैदराबाद – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघमचे अध्यक्ष करुणानिधी यांची प्राणज्योत मालवली. बुद्धीप्रामाण्यवादी नेत्यांच्या मुशीतून निर्माण झालेल्या द्रविडी चळवळीत करूणानिधी यांची जडणघडण झाली. पटकथालेखक ते तमिळनाडूचा मुख्यमंत्री असा पल्ला करुणानिधींनी गाठला.

-Ads-

मुथुवेल करुणानिधी यांचा जन्म 3 जून 1924 रोजी झाला. करुणानिधी यांना लहानपणापासून नाट्य, कला, साहित्य यांची आवड होती. पटकथा लेखक म्हणून करुणानिधी यांनी तामिळ चित्रपटसृष्टीतून आपल्या करिअरची सुरूवात केली.
द्रविडी चळवळीत करुणानिधींची जडणघडण झाली. पेरियार यांच्या विचार आणि लेखनाचा करुणानिधींच्या जीवनावर प्रभाव होता. आपल्या चित्रपटातून या विचारांच्या प्रसारावर त्यांचा भर होता. लेखन आणि वक्तृत्वकलेच्या बळावर त्यांनी चढत्या क्रमाने यशाची शिखरे सर केली.

वयाच्या 20 व्या वर्षांपासून करुणानिधींनी पटकथा लेखक म्हणून कारकीर्दीची सुरूवात केली. करुणानिधी यांनी तामिळ साहित्यात भरीव योगदान दिले. त्यांनी कविता, पत्रे, पटकथा, कादंबरी, चित्रपट गीते आत्मचरित्रे लिहिली.
वयाच्या 14 व्या वर्षी करुणानिधी यांनी राजकारणात प्रवेश केला. जस्टीस पक्षाच्या सभेला करुणानिधी जात असत. तेथील भाषणांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव जाणवला. त्यांनी स्थानिक युवकांची आघाडी उघडली. तामिळनाडू तामिळ मन्वार मंद्रम या तरूण संघटनेची स्थापना केली. ती द्रविड चळवळीची पहिली युवा आघाडी ठरली.

वयाच्या 33 व्या वर्षी करुणानिधी तामिळनाडू विधानसभेत निवडून आले. 1967 ला द्रमुक सत्तेवर आल्यानंतर करूणानिधी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री झाले. अण्णादुराई यांच्या मृत्यूनंतर 1969 मध्ये ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. 1957 ते 2016 पर्यंत 13 वेळा तामिळ विधानसभेवर निवडून गेले. प्रादेशिक पक्षाचे सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषविणारे पहिले नेते ठरले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)