करुणानिधींच्या निधनामुळे ममता बॅनर्जी हळहळल्या

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व डीएमकेचे अध्यक्ष एम करुणानिधी यांचे आज प्रदीर्घ आजाराने चेन्नई येथील कावेरी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. करुणानिधी यांच्या निधनाबाबत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी हळहळ व्यक्त केली आहे. करुणानिधी यांच्या निधनाबाबत ट्विट करताना ममता बॅनर्जी यांनी ” आज भारत मातेने तिचा एक थोर सुपुत्र हरवला आणि तामिळ जनतेने आपला जेष्ठ नेता हरवला. अशा दुःखद प्रसंगी आपण करुणानिधी यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य तामिळ जनतेच्या व करुणानिधी यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सामील आहोत. भारताला नेहमीच तुमची कमी भासेल” असा संदेश त्यांनी ट्विटरद्वारे दिला आहे.

तामिळनाडूचे माजी एम करुणानिधी यांचे आज सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी चेन्नई येथील रुग्णालयात निधन झाले. प्रदीर्घ आजारापणा मुळे करुणानिधी यांना २८ एप्रिल पासून चेन्नई येथील कावेरी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)