करुणानिधींच्या आजारपणामुळे 21 जणांच्या आत्महत्या

चेन्नई (तामिळनाडू) – द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम करुणानिधी याच्या आजारपणामुळे 21 जणांनी आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली आहे. करुणानिधी यांना 28 जुलै रोजी कावेरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तेव्हापासून ते आयसीयूमध्ये आहेत. त्यांच्या आजारपणामुळे शोकाकूल झालेल्या 21 कार्यकर्त्यांनी आतापर्यत आत्महत्या केल्याची माहिती द्रमुकने दिली आहे.

मात्र आत्महत्या केलेल्या कार्यकर्त्यांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी असे आतताईपणाचे कोणतेही पाऊल उचलू नये असे आवाहन पक्षाने केले आहे. द्रमुक पक्षाला एकसुद्धा कार्यकर्ता गमावणे चालणार नाही, असे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आणि करुणानिधी यांचे उत्तराधिकारी स्टॅलिन यांनी म्हटले आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने कर्तव्य, शिस्तपालन केले पाहिजे असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

करुणानिधी यांची प्रकृती स्थिर असून डॉक्‍टरांचे एक पॅनल त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून असल्याचे स्टॅलिन यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)