करीना कपूर उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?

भोपाळ – मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर आता काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री करीना कपूरला भोपाळ मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे. करीना कपूरचा चाहतावर्ग मोठा असल्याने याचा फायदा काँग्रेसला होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

भोपाळ मतदारसंघ मागील अनेक वर्षापासून भाजपचा बालेकिल्ला आहे. यामुळे याठिकाणी जर विजय प्राप्त करायचा असेल तर कोणत्याही राजकारण्याला उमेदवारी न देता बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरला द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील नेते गुडडू चौहान आणि अनीस खान केली आहे. करीना कपूरचा चाहता वर्ग प्रचंड असल्याने याचा मोठा फायदा काँग्रेसला होईल. शिवाय करीना महिला असल्याने महिलांचीही मोठा पाठिंबा तिला मिळेल. करीना कपूर ही पतौडी कुटुंबाची सून असल्याने जुन्या भोपाळमध्ये काँग्रेसला तिच्या उमेदवारीचा चांगला फायदा होऊ शकतो, असे गुडडू चौहान आणि अनीस खान यांनी म्हंटले आहे. यासंबंधीचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. पतौडी कुटुंब अनेक वर्षांपासून भोपाळमध्ये वास्तव्यास आहे. सैफ, करिना, शर्मिला टागोर, सोहा अली खान अनेकदा भोपाळला येतात. याचाच फायदा करिनाला होईल. यासाठी लवकरच काँग्रेसचे नगरसेवक मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)