करीनाच्या ‘या’ गोष्टीवर सारा फिदा

“केदारनाथ’चा ट्रेलर रिलीज झाला आणि सारा अली खान फॉर्मात आली. फिल्मी फॅमिलीशी संबंधित असल्याने सिनेवर्ल्डचा तिचा जुना परिचय आहे. घरातल्या प्रत्येक सदस्याकडून ती काही तरी शिकली आहे. पप्पा सैफ अली खानकडून इतिहास शिकली आहे. सिनेमात येण्यापूर्वी आपले शिक्षण व्यवस्थित पूर्ण कर, असा दंडक तिला सैफने घालून दिला आहे. आजी शर्मिला टागोरकडून समाजात वावरण्याचे रितीरीवाज आणि बोलण्या-चालण्यातील सौम्यपणा तिने शिकला आहे. कोठे जायचे, काय बोलायचे, कोणते कपडे घालायचे वगैरे वगैरे…पण त्यातही तिने जर जास्त काही कोणाकडून शिकले असेल, तर सेकंड मम्मी करीना कपूर खानकडून. तिच्याकडून साराने प्रोफेशनल कसे असावे हे शिकले आहे.

करीना नेहमीच आपल्या प्रोफेशनल आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वतंत्रपणे हाताळते. करीनाप्रमाणेच साराला प्रोफेशनल अॅप्रोच स्वीकारावासा वाटतो. जर या दोन्ही जबाबदाऱ्या स्वतंत्रपणे आणि एकमेकांमध्ये सरमिसळ न करता निभावता आल्या तर आपण नक्की यशस्वी होऊ शकतो, हे करीनाच्या उदाहरणावरून तिच्या चांगले लक्षात आले आहे.

सध्या चर्चेत असलेल्या स्टार किडपैकी सारा आणि श्रीदेवीची कन्या जान्हवी यांची खूप तुलना होत असल्याचेही तिच्या लक्षात आले. पण अशी तुलना होणे अनाठायी आहे. प्रत्यक्षात जान्हवी आणि आपण खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. लोकांनी आम्हा दोघींची ओळख स्टार किड म्हणून न करता आमच्या कामाच्या आधारे करावी, असे सारा म्हणाली.

“कॉफी विथ करण’मध्ये साराने आपल्या स्वतःविषयी आणखी काही गौप्यस्फोट केले. तिला म्हणे रणबीर कपूरबरोबर लग्न करायची ईच्छा आहे. पण रणबीर कपूर सध्या आलियाला डेट करतो आहे. त्यातही रणबीर हा करीनाचा म्हणजे साराच्या सावत्र मम्मीचा भाऊ म्हणजे मामा झाला. त्यामुळे हे समिकरण अवघड आहे. त्यामुळे सारा डेटिंग मात्र ती दुसऱ्याच कोणाबरोबर करणार आहे. त्यासाठी तिने कार्तिक आर्यनची निवड केली आहे. साराला याही बाबतीत करीनाकडून मार्गदर्शन मिळू शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)