करिष्माचा पुन्हा एकदा ब्रेक अप

बॉलिवूडमध्ये सध्या “वेडिंग सिझन’ सुरू झाला आहे. प्रियांका-निक, रणवीर-दीपिका, रणबीर-आलिया या सगळ्यांच्या विवाहाची जोरात तयारी सुरू झाली आहे. आता काही दिवसांनी करिष्माचेही दुसऱ्यांदा शुभमंगल होईल, अशी बातमी काही महिन्यांपूर्वी आली होती. संदीप तोष्णीवाल असे तिच्या बॉय फ्रेंडचे नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या अफेअरच्या बातम्या अधुनमधून येतच होत्या.

कपूर खानदानाच्या बहुतेक सगळ्याच इव्हेंटमध्ये संदीप तोष्णीवालची हजेरी असायचीच. बॉलीवूडच्या पार्ट्या, पुरस्कार समारंभ, विवाह, रिसेप्शन सगळीकडे हे दोघे एकत्रच असायचे. त्यामुळे त्यामध्ये काहीही नावीन्य राहिलेले नव्हते. आता या वर्षाच्या अखेरीस दोघांचा शुभविवाह होणार हे जवळपास निश्‍चित मानले जात होते. रणधीर कपूर आणि कुटुंबीयांनी करिष्माच्या दुसऱ्या लग्नासाठी होकारही दिला होता. पण आता अचानक बातमी समजली आहे की हे नाते अस्तित्वात येण्यापूर्वीच समाप्त झाले आहे. संदीप तोष्णीवाल आणि करिष्माचे बिनसले आहे. एवढेच नव्हे तर यांच्यातील नाते संपुष्टात येणे ही काही आताची अपडेट नाही. तर अगदी मे महिन्यातच यांच्यातील नाते संपलेले आहे. संदीप तोष्णीवालने करिष्मासमोर लग्नाचा प्रस्ताव तेंव्हाच ठेवलेला होता. त्यावरून कपूर कुटुंबीय अगदी आनंदात होते. सगळ्यांनी या प्रस्तावाचे स्वागतच केले होते. मात्र करिष्माने तेंव्हाच हा प्रस्ताव नाकारला होता, हे आता उघड होते आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संजय कपूरबरोबर घटस्फोट झाल्यानंतर आता पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीमध्ये अडकण्याची करिष्माची ईच्छा नाही. तिला आता समिरा आणि कियारा या दोन्ही मुलांच्या संगोपनावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. म्हणूनच तिने संदीप तोष्णीवालला टाळायलाही सुरुवात केली. मे महिन्यापासून दोघेही एकत्र कोठेही दिसले नाहीत. जूनमध्ये करिष्माला पुन्हा लग्न करायचे नाही, असे रणधीर कपूर म्हणाले होते. मात्र ते तिच्या काळजीपोटी म्हणत असावे, असे वाटले होते. पण आता करिष्माने त्यावर शिक्‍कामोर्तबच करून टाकले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)