करिश्मा कपूर आहे फक्त ‘पाचवी पास’

मुंबई : बॉलीवूडचे अनेक कलाकार उच्च शिक्षित आहेत. बॉलीवूडमध्ये करिअर करत असतांना त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. मात्र बॉलीवूडमध्ये असेही अनेक कलाकार आहेत की, त्यांना काही कारणाने आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. पण त्यांनी आपल्या असामान्य अभिनय क्षमतेच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अशाच काही  कलाकारांपैकी एक आहे ती म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर. करिश्मा कपूर ही  फक्त पाचवी पास आहे. कपूर कुटुंबियांमध्ये ती सर्वात कमी शिकलेली अभिनेत्री आहे.

मात्र जरी असं असलं तरी देखील तिने बॉलीवूडमध्ये आपल्या अॅक्टींगने अनेकांच्या मनावर राज्य केलं. कपूर कुटुंबिय अनेक दशकांपासून बॉलीवूडमध्ये आहे. कपूर कुटुंबातील अनेक जणं हे १० ते १२ पर्यंतच शिकलेले आहेत. त्यात करिश्मा फक्त ५ वी पर्यंत शिकली आहे. यामागे देखील एक कारण आहे. करिश्मा कपूरचा कैदी हा पहिला सिनेमा होता. शूटिंगदरम्यान ती ६ वी मध्ये शिकत होती. त्यावेळेस तिने अभिनयामध्ये करिअर करण्यावर भर दिला आणि शिक्षणाकड़े दुर्लक्ष केलं. त्यामुळे ती फक्त ५ वी पर्यंत शिकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)