करियर साप्ताहिकी (भाग २)

सेंट्रल पल्प अँड पेपर रिसर्च इन्स्टिट्यूट, सहारणपूर येथे कनिष्ठ लिपिकांच्या 6 जागा – अर्जदार पदवीधर व इंग्रजी टंकलेखनाची 40 शब्द प्रतिमिनिट व हिंदी टंकलेखनाची 30 शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत. संगणकाचे ज्ञान आवश्‍यक. वयोमर्यादा 25 वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 31 मार्च ते 6 एप्रिल 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली सेंट्रल पल्प अँड पेपर रिसर्च इन्स्टिट्यूटची जाहिरात पाहावी. तपशीलवार भरलेल अर्ज डायरेक्‍टर, सेंट्रल पल्प अँड पेपर रिसर्च इन्स्टिट्यूट, 174, सहारणपूर 247001 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2018.

भारतीय वायुसेनेत पुणे येथे कर्मचाऱ्यांच्या 2 जागा – उमेदवार बारावी उत्तीर्ण व इंग्रजी टंकलेखनाची 35 शब्द प्रतिमिनिट व हिंदी टंकलेखनाची 30 शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत. संगणकाचे ज्ञान आवश्‍यक. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’ च्या 31 मार्च – 6 एप्रिल 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायूसेना- पुणेची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज एअर ऑफिसर कमांडिंग- भारतीय वायू सेना, चंदननगर, डीमेलो पेट्रोल पंपासमोर, नगररोड, पुणे 411014 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2018.

भारत हेवी इलक्‍ट्रिकल्समध्ये कायदा अधिकाऱ्यांच्या 12 जागा – अर्जदार कायदा विषयातील पदवीधर असावेत. कायदा विषयातील विशेष पदव्युत्तर पदविकाधारकांना प्राधान्य. उमेदवारांना संबंधित कामाचा 1 वर्षाचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा 30 वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 24 ते 30 मार्च 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली भारत हेवी इलक्‍ट्रिकल्सची जाहिरात पाहावी अथवा बीएचईएलच्या http://careers.bhel.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मे 2018.

प्रतिभूती मुद्रणालय- नाशिक रोड येथे कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यकांच्या 35 जागा – अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. त्यांच्या गुणांची टक्केवारी 55% असावी व ते इंग्रजी टंकलेखनाची 40 शब्द प्रतिमिनिट तर हिंदी टंकलेखनाची 30 शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा 28 वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली प्रतिभूती मुद्रणालय, नाशिकरोडची जाहिरात पाहावी अथवा मुद्रणालयाच्या  https: / / ispnasik.spmcil.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मे 2018.

इंडियन बॅंकेत क्रेडिट मॅनेजर/सिनिअर मॅनेजरच्या 50 जागा – अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 7 ते 13 एप्रिल 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन बॅंकेची जाहिरात पाहावी अथवा इंडियन बॅंकेच्या  www. indianbank. या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मे 2018.

– दत्तात्रय आंबुलकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)