करियर साप्ताहिकी भाग ( दोन )

 आठवड्यात उपलब्ध असणाऱ्या विविध करिअर/शैक्षणिक संधींचा गोषवारा 

भारत हेवी इलक्‍ट्रिकल्स लि.मध्ये प्रशिक्षणार्थी इंजिनिअर्ससाठी संधी – अर्जदारांनी इंजिनिअरिंगमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व “गेट-2018′ ही प्रवेश पात्रता दिलेली असावी. अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 30 सप्टेंबर – 6 ऑक्‍टोबर 2017 च्या अंकात प्रकाशित झालेली भारत हेवी इलेक्‍ट्रीकल्सची जाहिरात पाहावी अथवा बीएचईएलच्या http://careers.bhel.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 फेब्रुवारी 2018.

-Ads-

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या गैरतांत्रिक विभागात उमेदवारी प्रशिक्षणार्थींच्या 75 जागा – अर्जदारांनी बीए., बीकॉम, बीएससी यासारखी पदवी कमीत कमी 55% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा 24 वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 13 ते 19 जानेवारी 2018 च्या अंकातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 फेब्रुवारी 2018.

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, बालासोरमध्ये ज्युनिअर रिसर्च फेलोशिपच्या 4 जागा – अर्जदारांनी संगणक विज्ञान, इलेक्‍ट्रॉनिक सायन्स, इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड कम्युनिकेशन इंजीनिअरिंग, इलेक्‍ट्रीकल व इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअरिंग यासारख्या विषयातील पदवी अथवा पदव्युत्तर पात्रता चांगल्या शैक्षमिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी नेट/गेट यासारखी प्रवेश पात्रता दिलेली असावी. वयोमर्यादा 28 वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 13 ते 19 जानेवारी 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटची जाहिरात पाहावी अथवा “डीआरडीओ’च्या drdo.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थलावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 फेब्रुवारी 2018.

– दत्तात्रय आंबुलकर

 

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)