करियर साप्ताहिकी (भाग एक)

आठवड्यात उपलब्ध असणाऱ्या विविध करिअर/शैक्षणिक संधींचा गोषवारा

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 94 जागा – अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची जाहिरात पाहावी अथवा महामंडळाच्या  www.mswarchousing.com अथवा https://maharecruitment.mahaonline.gov.in  या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2018.

आर्मी लॉ कॉलेज, पुणे येथे ऍडमिन सुपरवायझर म्हणून संधी – अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली आर्मी लॉ कॉलेज, पुणेची जाहिरात पाहावी अथवा कॉलेजच्या 020-65000387 या दूरध्वनीवर संपर्क साधावा. तपशीलवार व संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्‍टर-एडब्ल्यूईएस हेडक्वार्टर सदर्न कमांड (एडब्ल्यूईएस), पुणे 411001 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2018.

पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई अंतर्गत विधी अधिकारी पदाच्या 30 जागा – अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली पोलीस आयुक्तालय-बृहन्मुंबीची जाहिरात पाहावी अथवा मुंबई पोलिसांच्या www.mumbaipolice.mahareshtra.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2018.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, मुंबई येथे ज्युनिअर मेकॅनिकच्या 7 जागा- अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, मुंबईची जाहिरात पाहावी अथवा आयआयटीच्या http//www.iitb.ac.in/en/careers/staff-recuitment  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 फेब्रुवारी 2018.

केंद्रीय भूजल बोर्डात संशोधकांच्या 6 जागा ः अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 13 ते 19 जानेवारी 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 फेब्रुवारी 2018.

भारतीय नौदलात गोवा येथे टेलिफोन ऑपरेटरच्या 3 जागा ः अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व असावे व त्यांना टेलिफोन ऑपरेटिंगच्या कामाचा अनुभव असायला हवा. अर्जाच्या नमुन्यासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 16 ते 22 डिसेंबर 2017 च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय नौदल, गोवाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज दि फ्लॅग ऑफिसर कमांडिंग, दि. स्टाफ ऑफिसर (सिव्हिलियन) हेडक्वार्टर्स, गोवा नेव्हल एरिया, वास्को दी गामा, गोवा 403802 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 1 फेब्रुवारी 2018.

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड टेक्‍नॉलॉजी, पुणे येथे प्रोजेक्‍ट असिस्टंटसाठी संधी ः अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड टेक्‍नॉलॉजी, पुणेची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिट्यूटच्या www.diat.ac.in>careers@DIAT या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवार अर्ज व कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी संपर्क- डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड टेक्‍नॉलॉजी, गिरीनगर, पुणे 411025 या पत्त्यावर 2 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 10 वा.

पंजाब नॅशनल बॅंकेत हॉकी खेळाडूंसाठी 9 जागा- अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी हॉकीमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादजा 26 वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 13 ते 19 जानेवारी 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली पंजाब नॅशनल बॅंकेची जाहिरात पाहावी अथवा पीएनबीच्या www.pubindia.in>recruitment> या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले तपशीलवार अर्ज चीफ मॅनेजर (रिक्रुटमेंट सेक्‍शन), ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिव्हिजन, हेड ऑफिस, 1 ला मजला, प्लॉट नं. 4, वेस्ट विंग, सेक्‍टर-10, द्वारका, नवी दिल्ली 110075 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 3 फेब्रुवारी 2018.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)