करियर साप्ताहिकी (भाग एक )

      आठवड्यात उपलब्ध असणाऱ्या विविध करियर/शैक्षणिक संधींचा गोषवारा

सैन्यदलाच्या वैद्यकीय सेवा विभागात अधिकारी म्हणून संधी – अर्जदारांनी एमबीबीएस पात्रता पूर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्ट्या सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा 35 वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 31 मार्च- 6 एप्रिल 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाच्या वैद्यकीय सेवा विभागाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या www.awcssceutry.gov.in या संकेतस्थळा भेट द्यावी. संगणकतीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2018.

भारतीय विमानसेवा प्राधिकरणात ज्युनिअर एक्‍झिक्‍युटिव्ह (इलेक्‍ट्रॉनिक्‍स) च्या 330 जागा – अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 7 ते 13 एप्रिल 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय विमानसेवा प्राधिकरणाची जाहिरात पाहावी अथवा प्राधिकरणाच्या www.aai.acro-career-Recrutment या स्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2018.

महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालनालयात कर निर्धारण व प्रशासकीय पदाच्या 766 जागा – अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाची जाहिरात पाहावी अथवा महाराष्ट्र शासनाच्या www.mahapariksha.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2018.

आसाम रायफल्समध्ये शहीद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी शिपायांच्या 171 जागा – अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्पलॅयमेंट न्यूज’च्या 31 मार्च- 6 एप्रिल 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली असम रायफल्सची जाहिरात पाहावी अथवा आसाम रायफल्सच्या assamsrifles.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2018.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, भोपाळ येथे कार्यालयीन सहाय्यकांच्या 25 जागा – अधिक मारिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 31 मार्च – 6 एप्रिल 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, भोपाळची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिट्यूटच्याwww.aiimsbhopal.edu.inया संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2018.

– दत्तात्रय आंबुलकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)