येत्या 27 मे रोजी होत असलेल्या ‘आयपीएल क्रिकेट स्पर्धे’च्या अंतिम सामन्यापूर्वी दोन तास ‘स्टार प्लस’ वाहिनीवर ‘क्रिकेट फायनल पार्टी तो बनती है’ या विशेष कार्यक्रमाचे प्रसारण केले जाईल. बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर-खानने आपले चित्रीकरण नुकतेच पूर्ण केले. यावेळी ती आपल्या नेहमीच्या मनस्वी आणि विनोदी स्वभावात होती आणि यावेळी तिने आपल्या जीवनातील मैत्रीच्या स्थान किती अढळ आहे हे करिनाने सांगितले. 

करिना म्हणाली, “जीवनात मी नातेसंबंधांना, विशेषत: मैत्रीच्या नात्याला फार महत्त्व देते. माझ्या दृष्टीने तुमचे मित्र हे तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती असतात. किंबहुना माझ्या मित्र-मैत्रिणींनी आग्रह केला नसता, तर मी आजही बिनलग्नाचीच राहिली असते. माझ्या मित्र-मैत्रिणींनी मला नेहमीच पाठिंबा आणि आधार दिला असून माझ्या आयुष्यातील सर्व बऱ्या-वाईट प्रसंगांत ते माझ्याबरोबर राहिले आहेत. ते सदैव माझ्या जीवनाचा एक अविभाज्य हिस्सा बनून राहतील.” ‘क्रिकेट फायनल पार्टी तो बनती है’ या विशेष कार्यक्रमात बॉलिवूड आणि टीव्ही मालिकांतील अनेक सेलिब्रिटी सहभागी होऊन या कार्यक्रमाला एक आगळी शोभा आणतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)