करिना, कुपोषित दिसतेय काहीतरी खात जा…

झिरो फिगरचा ट्रेंड सुरू करणारी अभिनेत्री करिना स्वत:ला मेंटेन ठेवण्यासाठी खूप मेहनत घेते. ती नेहमीच आपल्या फॅशन आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. पण अलीकडे करिनाला याच फिटनेसमुळे ट्रोल व्हावे लागत आहे.

 

करिनाने नुकतेच फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रासाठी सिंगापूरमध्ये रॅंप वॉक केला. या शोनंतर तिने बेस्ट फ्रेन्ड अमृता अरोरासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत करिना फारच स्लिम दिसत आहे. यामुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले. अनेक युजर्सनी करिनाला भरपूर खाण्याचा सल्ला दिला. काहींनी तिला प्रोटीन्स घेण्याचे सुचवले. एका युजरने तर तिला चक्क कुपोषित म्हटले आहे. करिना, काही तर खात जा, असाही सल्ला तिला मिळाला आहे. आता करिना चाहत्यांच्या या टिप्सला कसे उत्तर देतेय हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)