करिना कपूर खान लवकरच करणार रेडिओवरही डेब्यू

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर-खान हिने तैमूरला जन्म दिल्यानंतर काही दिवसांपूर्वीच “वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक केले. त्यानंतर करिना आता नवीन माध्यमामध्ये आपली अदाकारी सादर करणार असून करीना आता लवकरच रेडिओवर डेब्यू करणार आहे.

सर्वांनाच करिना कपूर आणि करण जोहरच्या मैत्रीबद्दल तर माहित आहेच. करणने तिला या मैत्रीच्या नात्यामुळेच रेडिओ शोबद्दल कल्पना दिली. करण स्वत: “कॉलिंग करण’ नावाने रेडिओवर एक शो घेऊन येत असतो. त्याने यातूनच करिनालाही याबद्दल कल्पना दिली असल्याचे म्हटले जात आहे.

करिनाचा पहिला शो हा याचवर्षी डिसेंबरमध्ये ऑन एयर करण्यात येणार आहे. यासाठी तिने मुंबईतील एका स्टूडियोमध्ये नुकतेच फोटोशूट करत नवीन व्हेंचर सुरू केले आहे. या शोमध्ये करिना नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहे. तसेच “कॉलिंग करण’प्रमाणे श्रोत्यांना करिना कपूरशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या शे “इश्‍क 104.8′ एफएमवर प्रसारित करण्यात येणार आहे.

करिना लवकरच रेडिओवर एक शो होस्ट करताना ऐकायला मिळणार असल्याने तिच्या चाहत्यांसाठी ही बातमी नक्कीच आनंदाची आहे. ती यासोबतच लवकरच धर्मा प्रोडक्‍शनची निर्मीती असलेल्या “गुड न्यूज’ आणि “तख्त’ सारख्या चित्रपटांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)