करिअर साप्ताहिकी

  आठवड्यात उपलब्ध असणाऱ्या विविध करिअर/शैक्षणिक संधींचा गोषवारा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, मुंबई येथे ज्युनिअर इंजिनिअर्सच्या 3 जागा –  अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, मुंबईची जाहिरात पहावी अथवा आयआयटी मुंबईच्या http://www.iitb.ac.in/cn/careers/staff rectrutment या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2018.

-Ads-

न्युक्‍लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 9 जागा – वयोमर्यादा 35 वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 10 ते 16 मार्च 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली न्युक्‍लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जाहिरात पहावी अथवा न्युक्‍लिअर पॉवर कॉर्पोरेशनच्या www.upcil.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2018.

सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये डेप्युटी मॅनेजर (इंजिनिअरिंग) च्या 4 जागा – अर्जदार केमिकल इंजिनिअरिंगमधील पदवीधर अथवा रसायनशास्त्रातील एमएससी पात्रताधारक असावेत. अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 31 मार्च ते 6 एप्रिल 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जाहिरात पहावी अथवा कॉर्पोरेशनच्या www.cciltd.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज मॅनेजर (ह्युमन रिसोर्सेस), सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., कोर-5, स्कोप कॉम्प्लेक्‍स, 7- लोधी मार्ग, नवी दिल्ली 110003 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2018.

फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये टेक्‍निशियनच्या 45 जागा – अर्जदार शालांत परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा 30 वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 24 ते 30 मार्च 2018 च्या अंकात प्रकाशित जालेली फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटची जाहिरात पहावी अथवा www.fri.res.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2018.

टाटा मेमेरियल सेंटरमध्ये मुंबई व नवी मुंबई येथे महिला नर्सेसच्या 90 जागा – अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित जालेली टाटा मेमोरियल सेंटर-मुंबईची जाहिरात पहावी अथवा सेंटरच्या http://tmc.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थलावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2018.

राष्ट्रीय महिला आयोगामध्ये संशोधन सहाय्यकांच्या 4 जागा – अर्जदार समाजशास्त्र अथवा समाजकल्याण विषयातील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत व त्यांना संशोधनपर कामाची आवड असायला हवी. अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 24 ते 30 मार्च 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली राष्ट्रीय महिला आयोगाची जाहिरात पहावी अथवा आयोगाच्या www.ncw.nic.inया संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले व आवश्‍यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज उप-सचिव, राष्ट्रीय महिला आयोग, प्लॉट नं. 21, जसोला इन्स्टिट्यूशनल एरिया, नवी दिल्ली 110025 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 23 एप्रिल 2018.

   – दत्तात्रय आंबुलकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)