करिअर साप्ताहिकी (भाग दोन )

 नॅशनल बॅंक ऑफ ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटमध्ये उप-व्यवस्थापकांच्या 92 जागा-अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली नॅशनल बॅंक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटची जाहिरात पहावी अथवा “नाबार्ड’च्या https:..www.nabard.arg या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2018.

 भारतीय मानक ब्युरोमध्ये संशोधकांच्या 109 जागा – अर्जदारांनी मेकॅनिकल, मेटॅलर्जीकल, सिव्हिल, इलेक्‍ट्रीकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, केमिकल, फूड टेक्‍नॉलॉजी अथवा टेक्‍स्टाईल इंजिनिअरिंगमधील पदवी अथवा मायक्रोबायॉलॉजीमधील एमएससी पात्रता कमीत कमी 60% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली भारतीय मानक ब्युरोची जाहिरात पहावी अथवा ब्युरोच्या www.bis.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2018.

नॅशनल एन्व्हयरॉनमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, नागपूर येथे तंत्रज्ञांसाठी संधी – अर्जदारांनी रसायनशास्त्र, पर्यावरण विज्ञान, इन्स्ट्रुमेंटेशन, मायक्रोबायॉलॉजी, बायो-टेक्‍नॉलॉजी, रिमोट सेंसिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग वा वैद्यकशास्त्र या विषयातील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली नॅशनल एन्व्हायरॉनमेंटल इंजिनिअिंरंग रिसर्च इन्स्टिट्यूट, नागपूरची जाहिरात पहावी अथवा “निरी’च्या www.nccri.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2018.

 “इस्त्रो’ मध्ये अहमदाबाद येथे वैज्ञानिक अभियंत्यांच्या 3 जागा -उमदेवारांनी इलेक्‍ट्रॉनिक्‍स, इलेक्‍ट्रीकल व इलेक्‍ट्रॉनिक्‍स यासारख्या विषयातील एमई/एमटेक वा पीेचडी यासारखी पात्रता परीक्ष चांगल्या शैक्षमिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 10 ते 16 मार्च 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली “इस्त्रो’ अहमदाबादची  जाहिरात पहावी  अथवा “इस्त्रो’च्या http://www.sac.gov.अथवाhttp: // recruitment.sac.gov.in/QSAR या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2018.

– दत्तात्रय आंबुलकर 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)