करिअर साप्ताहिकी (भाग एक )

 आठवड्यात उपलब्ध असणाऱ्या विविध करिअर/शैक्षणिक संधींचा गोषवारा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा-2018 अंतर्गत 70 जागा –अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी अथवा आयोगाच्या www.upsc.gov.in अथवा http://mahaupsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2018.

 डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड टेक्‍नॉलॉजी, पुणे येथे संशोधनपर संधी – अर्जदार इंजिनिअरिंग वा तंत्रज्ञान विषयातील पदवीधर वा पदव्युत्तर पात्रताधारक असावेत व त्यांना संशोधनपर कामाचा 2 वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा 28 वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 10 ते 16 मार्च2018 च्या अंकात प्रकाशित झालेली डिफेंस इन्स्टिट्यूटच्या www.diat.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशिलवार अर्ज व कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी संपर्कृ डिपेंस इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड टेक्‍नॉलॉजी, गिरीनगर, पुणे 411025 येथे 28 मार्च 2018 रोजी सकाळी 11 वा.

 कोचिन शिपयार्डमध्ये प्रोजेक्‍ट इंजिनिअर्सच्या 6 जागा – अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली कोचिन शिपयार्डची जाहिरात पहावी अथवा शिपयार्डच्या www.cochinshipyard.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज चीफ जनरल मॅनेजर (एचआर), कोचिन शिपयार्ड लि., पेरुमानूर पोस्ट ऑफिस, कोची 682015 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2018.

 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी, पुणे येथे संशोधन सहाय्यकांच्या 12 जागा – अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी, पुणेची जाहिरात पहावी अथवा इन्स्टिट्यूटच्या www.tropmet.res.in/careers या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2018. न्युक्‍लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये पदवीधर

इंजिनिअर्ससाठी प्रशिक्षणार्थी म्हणून संधी – उमेदवारांनी मेकॅनिकल, केमिकल, इलेक्‍ट्रिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड कम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन वा सिव्हिल इंजिनिअरिगमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी गेट-2017 अथवा 2018 ही पात्रता परीक्षा दिलेली असावी. अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 30 सप्टेंबर ते 6 ऑक्‍टोबर 2017 च्या अंकात प्रकाशित झालेली न्युक्‍लिअर पॉवर कॉर्पोरेशनची जाहिरात पहावी अथवा कॉर्पोरेशनच्या http://www.gate.iitg.ac.in/ अथवा www.upcilcareers.co,in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2018.

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ बायो-एनर्जी रिसर्च, नैनीताल येथे ज्युनिअर रिसर्च फेलोशिपच्या 12 जागा – उमेदवारांनी रसायनशास्त्र, बायो-टेक्‍नॉलॉजी, बॉटनी- लाईफ सायन्स, फॉर्मेकॉलॉजी वा कृषी विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली 10 ते 16 मार्च 2018 च्या अंकत प्रकाशित झालेली डिफेंस इन्स्टिट्यूट ऑफ बायो एनर्जी रिसर्चची जाहिरात पहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्‍टर, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ बायो-एनर्जी रिसर्च, हहल्दवारी 263139, नैनीताल या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 1 एप्रिल 2018.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)