करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

जेजुरी- आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरच्या शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी येथे व्यवसाय करिअर मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. सध्या महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण घेणे अत्यावश्‍यक आहे. त्यासाठी महाविद्यालयाचा करिअर कौसिलींग सेल कार्यरत आहे. प्राचार्या डॉ. सुषमा चाफळकर यांनी कार्यशाळेचे उद्‌घाटन केले. कोहिनुर टेक्‍नीकल इन्स्टिटयुटचे संचालक संदीप शिरसाट यांनी फॅशन डिझाईन, इंटेरिअर डिझाईन, इलेक्‍ट्रीकल इंजिनिअरिंग, इव्हेन्ट मॅनेजमेंट आदी पाठ्यक्रमांचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. फॅशन डिझायनर माधुरी शिरसाट यांनी तरुणाईला आकर्षित करणाऱ्या फॅशन व त्याची निर्मिती याची माहिती दिली. प्रा. संजय वाव्हळ यांनी मोबाईल रिपेअरिंग या विषयी माहिती दिली. सोनाली काळे यांनी इंटेरिअर डिझाईन विषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळचे संयोजन करिअर कौसिलींग सेलचे प्रमुख किशोरी ताकवले यांनी केले. किरण कदम, तुजा देवकाते, श्‍याम पवार आदी यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)