करिअर घडवण्यासाठी प्रयत्नांची कास धरा : डॉ. शिरसाट

वाठार स्टेशन : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. अविनाश शिरसाट, व्यासपिठावर मान्यवर.

वाठार स्टेशन, दि. 12 (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांनी करिअर घडवण्यासाठी प्रयत्नांची कास धरावी, असा मूलमंत्र डॉ. अविनाश शिरसाट यांनी दिला.
वाठार स्टेशन, ता. कोरेगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालयाच्या अंतर्गत करिअर घडवण्याचा सोपा मंत्र या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ.अविनाश शिरसाट बोलत होते. प्राचार्य किरण भोईटे अध्यक्षस्थानी होते.
डॉ. शिरसाट म्हणाले, अनेक भाषांवर आपले प्रभुत्व असणे गरजेचे आहे, येणाऱ्या संकटाला धाडसाने सामोरे गेले पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्याला संगणकाचे ज्ञान असणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्याने बौद्धिक ज्ञान प्राप्त करून समाजासाठी त्याचा वापर केला पाहिजे.
कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा.सुंदर कांबळे यांनी करून दिली. सूत्रसंचालन प्रा. नितीन तांबे यांनी केले तर आभार प्रा. अमोल साळुंखे यांनी मानले. व्याख्यानमालेस विद्यालयाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)